राणांच्या पोस्टरवर अनुमती न घेताच खोडकेंचा फोटो
अमरावती
अमरावती लोकसभा निवडणुकीच्या आपल्या प्रचाराच्या पोस्टर आपण माझा फोटो लावला असल्याचे मला समजले असून सोशल मीडियावर सुद्धा वायरल केला जात आहे. सोशल मीडियावर किंवा पोस्टरवर माझा फोटो लावण्याची मला काहीही कल्पना नसून आपण माझा फोटो सोशल मीडियावर किंवा पोस्टरवर वापरण्याबाबत माझी व्यक्तिगत अनुमती सुद्धा घेतलेली नाही. हि बाब निवडणूक आदर्श आंचार संहितेचे उल्लंघन करणारी आहे.
करिता आपणास विनंती आहे की , लोकसभा निवडणुकीत माझ्या फोटोचा व नावाचा वापर करू नये, आपण माझ्या फोटोचा वापर ज्या-ज्या मीडियात केलेला आहे तेथून त्वरित काढून मीडियामध्ये त्या संदर्भात आपण आपले निवेदन सोशल मीडिया व प्रिंट मीडियामध्ये करावे. जर याबाबत आपण माध्यमांधून निवेदन ( खुलासा ) केले नाही तर मला कायदेशीर कारवाही करणे भाग पडेल. असे निवेदनात म्हंटलेले आहे.
@vidarbha Prajasattak.