आता आपल्या खासदाराकडून भरपूर अपेक्षा — ॲड.यशोमती ठाकूर
दर्यापुर
अमरावती लोकसभा मतदारसंघात शेवटी जनतेच्या इच्छेचा विजय झाला. या मतदारसंघात जनतेने प्रतिकूल परिस्थितीतही विजय मिळवून दिला आहे. आजपर्यंत आपण आणलेल्या कामांचं मागील खासदार भूमिपूजन करत होत्या आता आपला खासदार जनतेच्या विकासासाठी आणि अपेक्षांसाठी नक्कीच काम करणार असा विश्वास माजी मंत्री आमदार ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. अमरावती जिल्हा कॉंग्रेस किमिटी (ग्रामिण) च्या वतीने महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्या सत्कारानिमित्त त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना आमदार ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्या की, अमरावतीच्या धर्मनिरपेक्ष जनतेने यावेळी आपल्या एकही मत वाया जाऊ दिलं नाही. सर्व धर्मीयांनी अत्यंत आत्मीयतेने केलेल्या मतदानामुळे बळवंत वानखडे हे विजयी झाले. आतापर्यंत या मतदारसंघातील खासदार हे आम्ही आणलेल्या कामांची भूमिपूजन स्वतः करत होते. दुसऱ्यांच्या कामाच्या श्रेय घेण्यात सर्वात पुढे होते. पण आता ही परिस्थिती राहणार नाही. या मतदारसंघात बदल घडवण्यासाठी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं काहीही झालं तरी या मतदारसंघातून यावेळी पंजा या निशाणीवरच निवडणूक लढवली जाईल. जर पक्षश्रेष्ठींनी काही वेगळा विचार केला तर आम्ही स्वतंत्रपणे लढू परंतु पंजावरच निवडणूक लढवू. मात्र पक्षश्रेष्ठींनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ही जागा आम्हाला सोडली. ही जागा सुटल्यानंतर आपण सर्व कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी खूप परिश्रम घेतले. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणे कामाला लागले होते मात्र शेवटी ग्राऊंड वर परिस्थिती वेगळी असते आणि त्यावेळेस लढण्याची पद्धतही वेगळी असते. आपण सर्वांनी मतदान केंद्रापासून ते मतमोजणी केंद्रापर्यंत केलेले परिश्रम आणि घेतलेली दक्षता याच्या बळावरच आपल्याला हा विजय मिळाला आहे त्यामुळे आपणास सर्व कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे असे यावेळी ॲड. ठाकूर म्हणाल्या. आता बळवंतभाऊ वानखडे यांच्याकडून सर्व मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या खूप अपेक्षा आहेत. बळवंत वानखेडे हे दिसायला साधे भोळे असले तरी प्रत्यक्षात तसे नाहीत ते अत्यंत चाणाक्ष आणि कामसू नेते आहेत. त्यामुळे बळवंत वानखडे खासदार म्हणून आपल्या सर्वांच्या कसोटीवर नक्की उतरतील आणि जनतेची कामे पूर्ण करतील असा विश्वास यावेळी ॲड.ठाकूर यांनी व्यक्त केला.
यावेळी खा. बळवंतराव वानखडे, आमदार यशोमतीताई ठाकूर, बबलुभाऊ देशमुख (जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्हा कॉंग्रेस ), विरेंद्रभाऊ जगताप (माजी आमदार), हरिभाऊ मोहोड,कांचनमाला गावंडे, प्रदिप देशमुख, डॉ. राजिव ठाकूर, सुधाकरराव भारसाकडे, बाळासाहेब हिंगणीकर, भैय्यासाहेब मेटकर, दयाराम काळे, प्रताप अभ्यंकर, सतिष पारधी, अमित गावंडे, श्रीकांत बोंडे, रमेश काळे, प्रमोद दाळु, सहदेव बेलकर, महेंद्र गैलवार, प्रकाशराव काळबांडे, नामदेव तनपुरे,जयंतराव देशमुख, हरीष मोरे, सईद मौलाना, श्रीधर काळे, बब्बूभाई इनामदार, संजय बेलोकार, श्रीधर झोडपे, किशोर देशमुख, योगेश इसळ, गजानन राठोड, पंकज देशमुख, विरेंद्र जाधव, समाधान दहातोंडे, राहुल येवले, राजु कुऱ्हेकर, दिलीपराव काळबांडे, प्रविण मनोहर, सुरेश आडे, विनोद गुडधे, वसंतराव सोनार, प्रकाश खंडारे, दयाराम पटेल , मुकुंदराव देशमुख, शिवाजी देशमुख , बंडुभाऊ पोहोकार , नाजिम बेग, राजाभाऊ बंड, दिपक ठाकरे, किशोर दाभाडे, विनायक गवई, अशोक वानखडे तथा जिल्हाभरातुन कॉंग्रेस पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
@ विदर्भ प्रजासत्ताक
आमच्या वेब न्यूजचॅनल पोर्टल ला सबस्क्राईब करा व रहा अपडेट