टाकरखेडा संभू येथे अंत्यविधी दरम्यान मधमाशांचा हल्ला
३५ ते ४० नागरीक जखमी, रूग्णालयात उपचार सुरू
टाकरखेडा संभू संतोष शेंडे (वार्ताहर)
येथील स्मशानभुमीत अंत्यविधी सुरू असतानाच अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने नागरीकांची धावपळ सुरू झाली आणि जागा मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागले. या हल्ल्यात ३५ ते ४० नागरीकांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत.ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. यातील काहींवर वलगाव आणि अमरावतीमध्ये उपचार सुरू आहे.
गावातील मोहन लक्ष्मण टवलारे ५५ यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यामुळे दुपारी त्यांच्या अत्यंविधीला गावातील तसेच बाहेरगावातील नागरीक हजर झाले होते. येथील अंबराई येथील स्मशानभुमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक मधमाशांनी हल्ला चढविला. त्यामुळे अंत्यंविधी मध्येच सोडून नारीकांनी पळ काढला. अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे नागरीक सैरावैरा झाले.काहींनी नजिकच्या तुरीच्या शेतात आडोसा घेतला.त्यामुळे ते बचावले.त्यामुळे काही वेळानंतर पुन्हा अंत्यविधी पुर्ण करण्यात आला. मात्र तोपर्यंत या हल्ल्यात ३५ ते ४० जण जखमी झाले होते. काहींनी गावातीलच डॉक्टरकडे धाव घेतली तर काही जण तातडीने वलगाव, अमरावती येथील खासगी रूग्णालयात दाखल झाले.त्यांच्यावर उपचार सुरू आहे.या हल्ल्यात मुरलीधर वानखडे (कवठा), सचिन गणोरकर (अकोट),टाकरखेडा संभु येथील सुरेंद्र देशमुख, देवानंद टवलारे, सुधीर टवलारे, राजू निमकर, अनिकेत वानखडे, सुरज कांडलकर, गोपाल देशमुख, बाबू येवतकर, प्रवीण पाटील, वृषभ टवलारे यांच्यासह ३५ ते ४० जणांचा समावेश आहे.
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !