माजी आ.बच्चू कडू यांच्या कडून आ.प्रवीण तायडे यांच्या जीवाला धोका
सुरक्षा प्रदान करण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२अमरावती
अचलपूर मतदार संघाचे माजी आमदार बच्चू कडु यांच्या व त्यांच्या गुंडु प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचा इतिहास पाहता अचलपुर मतदार संघाच्या विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांच्या जिविताची हानी होऊ नये व त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारातुन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार यांच्या आदेशावरुन त्याचे गावगुंड कार्यकर्ते हल्ला किंवा अपघात करण्याची शक्यता टाळता येत नाही म्हणून विद्यमान आमदारांना आपल्या विभागातुन सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी आज अचलपूर येथील भाजप शिष्टमंडळाने ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना एका निवेदनामार्फत करण्यात आले.
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये अचलपुर विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेदवार श्री. प्रविण वसंतराव तायडे हे १२००० च्या वर मताधिक्य घेऊन प्रहारच्या बच्चु कडु, कॉग्रेस चे बबलु देशमुख यांच्या विरोधात विजय झाले. परंतु प्रहार पक्षाच्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण पराजीत झालो हे पचनी पडत नसल्याने प्रहार पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष माजी आमदार बच्चु कडू गावागावात मतदारांना धमकी व वजा दबाव टाकत आहे व बच्चु कडू यांचे कार्यकर्ते शिवीगाळ व दबाव टाकण्याचे काम करत आहे. तसेच व्हॉट्स अॅप, फेसबुकवर सुध्दा आमदार प्रविण तायडे यांच्याविरोधात शिवीगाळ व अश्लिल भाषेचा वापर करुन त्यांना बदनामी व मानहाणी करीत आहेत. माजी आमदार बच्चु कडु यांचा आतापर्यंतचा इतिहास पाहता त्यांच्याकडे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते आहे.
गेल्या २९, ३० डिसेंबर च्या मध्यरात्री बहिरम यात्रेमध्ये विद्यमान आमदार श्री. प्रविणभाऊ तायडे यांचे यात्रा करणाऱ्या भाविक भक्तांच्या स्वागतासाठी दर्शनी भागात लागलेल्या बॅनरवर थुंकुन काही बॅनर फाडण्याच्या किळसवाणा प्रकार प्रहार कार्यकत्यांनी केला असुन असे प्रकार गेल्या अनेक वर्षापासुन अचलपुर मतदार संघात सुरु आहे. प्रहार पक्षा व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचे बॅनर लागले को प्रहारचे कार्यकर्ते ते बॅनर ब्लेडने फाडण्याचे चे प्रकार झाले आहे. त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल आहे तरी आम्ही आपणास माजी आमदार बच्चू कडु यांच्या व त्यांच्या गुंडु प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचा इतिहास पाहता अचलपुर मतदार संघाच्या विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांच्या जिविताची हानी होऊ नये व त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारातुन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार यांच्या आदेशावरुन त्याचे गावगुंड कार्यकर्ते हल्ला किंवा अपघात करण्याची शक्यता टाळता येत नाही म्हणून विद्यमान आमदारांना आपल्या विभागातुन सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी आज भ%