पत्रकार हे समाजाचा आरसा
उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांचे प्रतिपादन, जिल्हा बँकेत पत्रकारांचा सत्कार समारंभ
विदर्भ प्रजासत्ताक
दि.६
अमरावती,
पत्रकार हे समाजाला आरसा आहे. शासन, प्रशासन आणि समाज यातील महत्वाचा दुवा हा पत्रकार असतो,त्यामुळे समाजात या घटकाचे अनन्यसाधारण महत्व आहे.ते खऱ्या अर्थाने सत्कारास पात्र आहे.असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी केले.
जागतिक पत्रकार दिनाचे औचित्स साधुन जिल्हा मध्यवर्ती बँकेत शहरातील सर्वच वृत्तपत्र व इलेक्ट्रानिक विभागाचे प्रतिनिधींचा सत्कार समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. अध्यक्ष आ. बच्चु कडू यांच्या मागदर्शनात तसेच उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांच्या संकल्पनेतुन सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष अभिजित ढेपे, प्रमुख अतिथि म्हणुन संचालिका सुरेखा ठाकरे, संचालक रवींद्र गायगोले, अजय मेहकरे, चित्रा डहाणे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल उपस्थित होते.
यावेळी जितू दखणे, रवींद्र लाखोडे, गिरीश शेरेकर, भैय्या आवारे, संदीप शेंडे, सुधीर भारती, जितू दोशी,शैलेश धुंदी, दूर्वास रोकडे, विजय ऋषी, वैष्णवी मांडळे, योगिनी अर्डक, सुनील चौरसिया, प्रवीण कपिले, खोजयमा खुरम, संदीप मानकर, राजेंद्र ठाकरे, मनीष जगताप, सुरेंद्र आकोडे, प्रणय निर्वान, शिवराज उंबरकर, सुरज दहाटे, नितेश राऊत, राज माहोरे सागर डोंगरे, अनिरुद्ध उगले, सागर तायडे, रोहित खाडे, अनिकेत दहातोंडे यांचा सत्कार घेण्यात आला.