जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनिल अग्रवाल अविरोध
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सर्वसाधारण सभेत एकमताने निवड
जिल्हा कार्यकारिणीची देखील अविरोध निवड
दि25 वि.प्रजासत्ताक अमरावती
मुंबई मराठी परिषद संलग्नित अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमरावती मंडलचे संपादक अनिल अग्रवाल यांची सलग दुसऱ्यांदा अविरोध निवड करण्यात आली आहे. मागील कार्यकाळात पत्रकार संघासाठी केलेल्या उत्तम कागमिरीची दखल घेऊन जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सर्वसाधारण सभेने अनिल अग्रवाल यांची अविरोध निवड केली आहे. अग्रवाल यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी १ वाजता हॉटेल हिंदुस्थान इंटरनॅशनल येथे पार पडली. या सभेत जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीसाठी २५ सदस्यांची निवड करण्यात आली. या सदस्यांमधून जिल्हा कार्यकारीणीमधील पदाधिकारी तसेच सदस्यांची एकमताने निवड झाली.
यावेळी अध्यक्षपदी अनिल अग्रवाल यांच्यासह सरचिटणीस पदी दैनिक जनमाध्यमचे प्रफुल्ल घवळे आणि दैनिक सकाळचे सुधीर भारती यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी दैनिक हिंदुस्थानचे संपादक उल्हास मराठे, न्यूज 18 लोकमतचे संजय शेंडे, सिटी न्यूजचे चंदू सोजातिया, युसीएनचे प्रतिनिधी अरुण जोशी, दैनिक मंगल प्रहरचे संपादक अरुण तिवारी, दैनिक दिव्य मराठीचे ब्यूरो चीफ अनुप गाडगे यांची निवड झाली.
संघटनेच्या कोषाध्यक्षपदी उद्याची बातचे संपादक विजय ओडे यांची, जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी दैनिक मातृभूमीचे गौरव इंगळे यांची, सहकोषाध्यक्षपदी दैनिक पुण्य नगरीचे सुनील धर्माळे यांची अविरोध निवड केली. तसेच सहसचिवपदी एबीपी माझाचे प्रणय निर्वाण, दैनिक विदर्भ मतदारचे संजय बनारसे, ग्रामीण प्रतिनिधी म्हणून हेमंत निखाडे, मार्गदर्शक म्हणून दैनिक हिंदुस्थानचे मनोहर परिमल, हिंद हिमालयचे बाबा राऊत, दूरदर्शनचे यशपाल वरठे, समाचार दर्शनचे अशोक जोशी यांची निवड करण्यात आली आहे. महिला प्रतिनिधी म्हणून छाया काळमेघ, दैनिक जनमाध्यमच्या वैष्णवी मांडळे यांची निवड झाली. तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी दैनिक देशोन्नतीचे मंगेश तायडे, दैनिक नवभारतचे शंकर जयस्वाल, न्यूज नेशन महाराष्ट्रचे सुरेंद्र आकोडे, साम टिव्हीचे अमर घटारे, टीव्ही 9 मराठीचे स्वप्नील उमप, बीबीसीचे नितेश राऊत, पद्मेश जयस्वाल, प्रतिदिन अखबारचे त्रिदीप वानखडे, लोकमतचे उज्वल भालेकर,साप्ताहिक कसरतचे हुक्मीचंद खंडेलवाल, दैनिक भास्करचे विजय धामोरीकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत सदस्यपदी डॉ. लोभस घडेकर, दैनिक जनमाध्यमचे सुधीर केने यांची निवड नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आली आहे.
या सभेला जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ देशमुख (चांदूर बाजार), पवन शर्मा (धामणगाव रेल्वे), संदीप राऊत (तिवसा), संजय अग्रवाल (परतवाडा), राज इंगळे (अचलपूर), नंदकिशोर इंगळे (नांदगाव खंडेश्वर), संतोष शेंडे (भातकुली) यांच्यासह दर्यापूर, मोर्शी, चांदूरेल्वे, चिखलदरा व धारणी तालुक्यातील जवळपास २०० पत्रकार सभासद उपस्थित होते.
सभेची सुरुवात कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. संचालन प्रफुल्ल घवळे यांनी तर आभार प्रदर्शन गौरव इंगळे यांनी केले. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोहर परिमल यांनी काम पाहिले. यावेळी सभेत विविध विषयावर सर्व मुख्य पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले.
निवड झालेले सर्व पदाधिकारी तसेच कार्यकारिणी सदस्य यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
यावर्षी पत्रकारांचे अधिवेशन – अनिल अग्रवाल
अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर अध्यक्ष म्हणून निवेदन सादर करताना अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीवर प्रकाश टाकला. यावेळी ते म्हणाले की पत्रकारांचे न भूतो न भविष्यती असे अधिवेशन यावर्षी घेण्यात येईल.
@विदर्भ प्रजासत्ताक