
आजपासून चिखलदरा-परतवाडा वन वे वाहतूक
जाताना परतवाडा धामणगांव मार्गे चिखलदरा
येताना चिखलदरा घटांग मार्गे परतवाडा
जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना जारी
७ जुलै ते १ सप्टेंबर पर्यंत वन वे वाहतूक राहणार
अमरावती
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे पावसाळी पर्यटनासाठी प मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सणासुदीचे व शासकीय सुट्टीचे दिवशी तसेच शनिवारीव रविवारी पर्यटकांची तेथे गर्दी असते. ही अ बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चिखलदरा पर्यटनस्थळी जाण्याकरिता ७ ३ जुलै २०२४ ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सुट्टीचे दिवशी व प्रत्येक शनिवारी व रविवारी वाहतूक एक मार्गी चन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ठी पर्यटकांना चिखलदऱ्याला जाण्यासाठी व धामणगाव, मडकी, मोथा मार्गे, तर परत व येताना सलोना, घटांग मार्गे यावे लागणार आहे.
चिखलदरा हे पर्यटनस्थळ असुन – आजुबाजूचे जिल्हयातील तसेच इतर ठिकाणावरुन सुट्टीचे दिवशी तसेच
शनिवार व रविवारला भरपुर प्रमाणात पर्यटक चिखलदरा येथे येत असतात. परतवाडा ते चिखलदरा रोड हा अरुंद व घाट वळणाचा असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ७ जुलै ते १ सप्टेंबर दरम्यान महत्त्वाचे सन, उत्सव, शासकीय सुट्टीचे दिवशी व महिण्यातील प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी परतवाडावरुन चिखलदराकडे जाणारी वाहतुकही परतवाडावरुन धामणगांव मार्गे चिखलदरा तसेच चिखलदरा वरुन परतवाडा कडे जाणारी वाहतुक ही चिखलद यावरुन घटांग मार्गे परतवाडा या एक-मार्गी पध्दतीने (वन-वे) करण्यात – येत आहे.

या रस्त्यावरील असलेल्या गावातील – स्थानिक नागरिकांना सदर रस्ते वाहतूक – वळविण्याचे आदेशामधुन सुट देण्यात येत आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणा-या – विरुध्द मोटार वाहन कायदा १९८८ वे – महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद केले आहे.