मराठवाडा भुकंपाने हादरला; ४.५ रिश्टर स्केलची नोंद
आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप
दि.१० विदर्भ प्रजासत्ताक
हिंगोली
मराठवाडा भुकंपाने हादरला. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये भूकंपांचे धक्के बसले आहेत. सकाळी सातच्या सुमारास हा भुकंप झाला. आखाडा बाळापूर हे भूकंपांचे केंद्र होते. ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. माहितीनुसार आतापर्यंत सर्वात मोठा आजचा भूकंप धक्का आहे.
हिंगोली जिल्हा हादरला
मराठवाड्यात आज (दि.१०) 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये भूकंपांचे धक्के बसले आहेत. आखाडा बाळापूर हे भूकंपांचे केंद्र होते. सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान भूकंपाचे केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून १३ किमी असल्याचे सांगितले जात आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.