
बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूच्या पॅनलचा सुपडा साफ;
भाजपला मात देत शंशाक राव डार्क हॉर्स हे ठरले किंगमेकर
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२०मुंबई –
मागील काही दिवसांपासून दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा होती. या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू 20 वर्षानंतर एखाद्या निवडणुकीसाठी एकत्र आले होते. मात्र दोन्ही ठाकरे बंधूनी एकत्रीत लढवलेल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळाली नाही तर भाजप प्रणित सहकार समृद्धी पॅनलने सात जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत शंशाक राव डार्क हॉर्स ठरले आहेत. त्यांनी 21 पैकी 14 जागा जिंकत सर्वांचे अंदाज चुकवले.
मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत. या निवडणुकापूर्वी बेस्ट पतपेढीची ही निवडणूक ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणामुळे काय चमत्कार घडू शकतो याची लिटमस टेस्ट मानली जात होती. मात्र या निवडणुकीत त्यांना 21 पैकी एकही जागा निवडून आणता आली नाही. विशेष म्हणजे गेल्या नऊ वर्षांपासून बेस्ट को ऑपरेटीव्ह सोसायटीवर ठाकरे गटाचे एकहाती वर्चस्व राहिलेले आहे. असे असताना कुठेही चर्चेत नसलेले शशांक राव यांनी शांतपणे आपले काम केले आणि त्यांच्या पॅनलला बेस्टच्या 15 हजार कर्मचाऱ्यांनी भरभरुन पाठिंबा दिल्याचे दिसत आहे.
भाजप प्रणित समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी
बेस्ट पतपेढी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 21 पैकी 7 उमेदवार विजयी झाले.