अमरावतीत ५ किलो एमडी ड्रग्स जप्त; डीआरआयची मोठी कारवाई, ५ ते ६ कोटींचा साठा हस्तगत
अमरावती – शहरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. नागपूरच्या महसूल गुप्तचर संचलनालय (डीआरआय) पथकाने ५ किलो एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स जप्त केल्याचे समजते.
ही कारवाई गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका फ्लॅटमध्ये करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्सची अंदाजे किंमत ५ ते ६ कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
दरम्यान, नवसारी परिसरातील जीएसटी भवन येथे डीआरआयचे पथक सध्या तळ ठोकून असून पुढील तपास व कारवाई सुरू आहे. या संपूर्ण कारवाईसाठी तीन ते चार स्वतंत्र पथके तैनात असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणातून मोठ्या ड्रग्स तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. मात्र डीआरआय कडून अद्याप पर्यंत या कारवाईची अधिकृत माहिती देण्यात आली नाही. अधिकृत माहिती आल्यानंतरच संपूर्ण तपशील स्पष्ट होणार आहे.

