अजित पवारांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात
अजित पवारांसह 5 जणांचा दुर्देवी मृत्यू
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे. तर विमान जळून खाक झालं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चार सभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. सुपे जिल्हा परिषद गटासाठीही एक सभा होणार होती. यासाठी अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लैंडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने अपघातस्थळाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.
सविस्तर बातमी थोड्य्याच वेळात अपडेट होत आहे

