जिल्ह्यात सर्वदूर रिमझीम पाऊस
अमरावती
जिल्ह्यातले शेतकरी व नागरिक ज्या रिमझीम पावसाच्या प्रतीक्षेत होते, तो पाऊस आज पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झाला. जिल्ह्यात सर्वदूर या पावसाची नोंद झाली आहे. खरिपाच्या पिकांना या पावसाने संजीवनी मिळाली आहे तर वातावरणात गारवा हि वाढला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत फक्त सरासरी २८३ मिमी पाऊस झाला आहे. आजच्या तारखेपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत तो ८७.२ टक्के आहे. नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अंजनगाव, चांदूर बाजार तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान विभागाने शुक्रवारी पुढचे काही दिवस पावसाची शक्यता वर्तविली होती जिल्ह्यात जवळपास ९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या पिकांची स्थिती चांगली आहे. रविवारी पहाटेपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. या पावसाने सर्वांच्या चेहर्यावर समाधान झळकत आहे. जिल्ह्यातील वातावरण अल्हाददायक झाले आहे. अंजनसिंगी, अंजनवती, कावली, ढाकुलगाव, अशोकनगर, पिंपळखुटा, चिंचपर, गुंजी व इतर परिसरात पावसाची सकाळी ४ वाजता पासून रिपरिप सुरू झाली त्यामुळे परिसरातील शेतकरी व शेतमजूर घरी पाहायला मिळाले. तर काही भागात नदी नाले ओसंडून वाहत आहे त्यामुळे असाच पाऊस दिवसभर सुरु राहिला तर पूर येण्याची शक्यता आहे
Related Stories
November 21, 2024