
शिरजगांव बंड येथील अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी गावकर्यांच अन्नत्याग
अतिक्रमीत गाळे धारकाने बनावट ७/१२ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार
चांदूर बाजार
अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी चांदूर बाजार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका समोर शिरजगाव बंड येथील गावकर्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे दरम्यान भाजपा नेते गोपाल तिरमारे व तालुकाध्यक्ष रमेश तायवाडे यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्याशी संवाद सादला व तात्काळ सदर प्रकरण मार्गी लागणार अशे आश्वासन उपोषण कर्त्यांना दिले शिरजगांव बंड येथील संत श्री मारोती महाराज व गाडगे महाराजांच्या मंदिर परिसरात ग्राम पंचायत हद्दीमध्ये अतिक्रमीत गाळे धारकाने अनधिकृत मार्केट तयार केले त्यामुळे समूहिक समारंभ,भजन व कीर्तनाचे कार्यक्रम करण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचा आरोप उपोषण कर्त्यांकडून करण्यात येत आहे दिनांक २५ मार्च १९८० रोजी उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्या आदेशानुसार मौजा शिरजगाव बंड सर्व्हे नंबर २०१/१,२०२/२ मौजा जमापूर सर्व्हे नंबर १९ मध्ये एकूण १४३ प्लॉट मंजूर करण्यात आले व नागिरकांना वाटप करण्यात आले होते तर मौजा शिरजगाव बंड भूमापन क्र.२०१/१,२०२,/२ सर्व्हे नंबर १९ मध्ये प्लॉट क्रमांक १४५ निलेश रावळे याच्या नावे असल्याच समोर आले अतिक्रमीत गाळे धारक निलेश रावळे यांनी बनावट ७/१२ तयार केला असून लेलाउट मधील एकूण प्लॉट ची संख्या १४३ पर्यंत आहे त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून दोषी असलेल्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उपोषण कर्त्यांकडून करण्यात येत आहे या धक्कदायक प्रकाराची तहसीलदारांनी दखल घेत सदर बनावट ७/१२ बंद करण्यात यावा अशे आदेश देण्यात आले एकाच पेंडोल मध्ये उपोषणकर्ते लक्ष्मण दाभणे,मनोहर निंभोरकर, राजेश कडू,बाबुराव रावणकर,नितीन मेहेरे,अनिल देहा,प्रभाकर रावळे,विनोद पागरूत,पवन भेले,बाबुराव गुबरे व निर्भय रघुवंशी या १० नागरिकांचे अंनत्याग आंदोलन सुरु आहे भाजपा नेते गोपाल तिरमारे व तालुकाध्यक्ष रमेश तायवाडे यांनी भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्याशी संवाद सादला व तात्काळ सदर प्रकरण मार्गी लागणार अशे आश्वासन उपोषण कर्त्यांना दिले.

बनावट ७/१२ बंद करण्याचे तहसीलदाराचे आदेश
गांव नमुना २९३ शिरजगांव बंड २९०७/०८/०९/१९८३ पासूनचे प्लॉट रजिस्टरचे प्रमाणित प्रतीचे अवलोकन केले असता रमेश मारोतराव रावळे यांना अंतरिम आदेश दि.२७/०४/१९८२, केस नं. १०५/१४/८१-८२ नकाशानुसार, १४२ चा नंबरचा ३०×५० = १५०० चौण फुट प्लॉट देण्यात आला या व्यतिरीक्त त्यांचे नावे प्लॉट रजिस्टरला इतर कोणत्याही प्लॉटची नोंद आढळुन येत तहसीलदारांनी आदेशा मध्ये नमूद केल व तलाठी अहवालानुसार, मौजा शिरजगांव बंड स. न. २०२/१, २०२/२ व मौजा जमापूर येथील सर्वे नं. १९/१४२ क्रमांकाचा क्षेत्र-३०×५० = १५०० चौ. फुट प्लॉटचा संगणकीकृत ७/१२ तयार करण्यात यावा तसेच सर्व्हे नं. २०२/१ व २०२/२ प्लॉट क्र. १४५ चा ७/१२ बंद करण्यात यावा असा आदेश चांदूर बाजार तहसीलदार यांनी दिला आहे.