
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या अमरावती बंद
विहिंप, बजरंग दल, हिंदुत्ववादी संघटनांचे आवाहन
राजकमल चौकात सकाळी १० वाजता निदर्शने
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२४अमरावती
जम्मू-काश्मीरमधील पहलगामयेथे मंगळवार, २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी शुक्रवार, २५ एप्रिल रोजी अमरावती बंदचे आवाहन केले आहे. २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राजकमल चौकात पहलगाम दहशतवादी हल्लयाच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येईल.
सर्व बाजारपेठा बंद राहणार बंटी परवानी यांनी या बंद बद्दल सांगितले की, शुक्रवार, २५ एप्रिल रोजी अमरावती बंद दरम्यान शहरातील बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद राहतील हा बंद यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
