
देवदर्शनाआधीच काळाचा घाला, हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळमधील तिघांचा मृत्यू
विदर्भ प्रजासत्ताक
अहमदाबादमधील विमान अपघात ताजा असतानाच केदारनाथ धाममध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या दुर्घटनेत पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे केदारनाथ धामला जात असताना गौरीगुंड आणि त्रिजुगीनारायण यादरम्यान हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या दुर्देवी घटनेत महाराष्ट्रातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दोन वर्षाच्या काशीचाही समावेश आहे. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे यांनी हेलिकॉप्टर अपघाताची पुष्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ धाम येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळमधील वणी येथील जयस्वाल कुटुंबाचा मृत्यू झाला. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, काशी राजकुमार जयस्वाल अशी तिन्ही मृतांची नावे आहेत. १२ जून रोजी राजकुमार जयस्वार हे पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशीसोबत वणी इथून केदारनाथसाठी गेले होते. पण देवदर्शन करण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.या घटनेने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- ताज्या बातम्यांचे अपडेट वाचण्यासाठी
आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा !
बातम्या आणि जाहिरात साठी सपंर्क करा अरुण जोशी मो. ८६०५९४८८५३