शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘क्रीडा सवलती’ देण्यावर भर : खा. डाॅ. अनिल बाेंडे
श्री. हव्याप्र मंडळाच्या क्रीडा प्रस्तावाची दखल : राष्ट्रीय विजेते खेळाडूंचा सत्कार
दि9 वि.प्रजासत्ताक अमरावती
आजचा भारत हा खऱ्या अर्थाने वेगळा आहे. पुर्वी आतंरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा सहभाग केवळ औपचारिक स्वरूपाचा होता, पदक मिळविणे तर दूरच. पारंपारीक खेळांचं वैभव असणाऱ्या या देशाच्या क्रीडा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली ती २०१४ नंतर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांगीण विकास प्रक्रीयेमध्ये भारतीय क्रीडा क्षेत्राला ‘खेलो इंडिया’ वैभव दिले. आज अनेक जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू नावलाैकीक करीत आहेत. त्यामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे खेळाडूंची विजयाची परंपरा अविरत आहे. या क्रीडा क्षेत्रामध्ये शासकीय शाळांचा म्हणजेच जिल्हा परिषद, आश्रम शाळा, अनुसूचित शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात भरारी घेता यावी याकरीता शासकीय सवलत, अनुदान व सुविधा मिळाव्यात असा प्रस्ताव श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने शासनाकडे दाखल केला असून त्या अनुषंगाने शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा साेईसुविधा व सवलती देण्याचे आपले ध्येय असल्याचे मत लाेकप्रिय खा. डाॅ. अनिल बाेंडे यांनी व्यक्त केले.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विविध क्रीडा विभागातील खेळाडूंनी वर्ष २०२२-२३ दरम्यान उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन करीत विविध पदकांचे मानकरी ठरलेत. या खेळाडूंचा सत्कार साेहळ्याचे आयाेजन शनिवार दि.८ एप्रिल २०२३ राेजी सांयकाळी ६ वाजता स्व. साेमेश्वर पुसतकर सभागृह येथे आयाेजीत करण्यात आला हाेता. कार्यक्रमाचे मुख्य अथिती व मार्गदर्शक म्हणून खा. डाॅ. अनिल बाेंडे सभेला संबोधित करीत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, प्रमुख अतिथी मध्ये मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, आश्रम शाळा संचालक राजेश महात्मे, ज्येष्ठ प्रशिक्षक राजेश पांडे, डाॅ. कविता वाटाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर विविध क्रीडा विभागातील खेळाडूंचा खा. डाॅ. अनिल बाेंडे व व्यासपीठावर उपस्थितीत मान्यवरांच्याहस्ते पदक, स्मृतिचिन्ह देत सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके म्हणाले, मंडळातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लाैकीक मिळवित असून क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून युवापीढीचे खेळांद्वारे नव्याने सक्षमीकरण करता येईल. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी अभ्यासपुर्ण मनाेगत व्यक्त करीत यशस्वी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे संचलन प्रा. डाॅ. मधुकर बुरनासे यांनी तर आभार प्रा. आनंद महाजन यांनी मानले. कार्यक्रमाला माेठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी, प्रशिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी-खेळाडू व पालक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
श्री हव्याप्र मंडळाच्या प्रस्तावाची दखल
श्री हव्याप्र मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रामुख्याने शासकीय व आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळांमधील मधील विद्यार्थी आजही क्रीडा क्षेत्रापासून दूर दिसत आहे. या घटकातील मुलांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना क्रीडा प्रशिक्षणासह शासनाद्वारे क्रीडा साेई-सुविधा व अनुदान मिळाल्यास देशाच्या क्रीडा क्षेत्राला ‘साेन्याचे दिवस’ लाभतील असा विश्वास व्यक्त करीत एक क्रीडा प्रस्ताव मंडळार्ते खा. डाॅ. अनिल बाेंडे यांना देण्यात आला. यावर खा. डाॅ. बाेंडे यांनी त्या दृष्टीकाेणातून शासन लवकरच या बाबतीत सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास केला.
यशस्वी खेळाडूंचा सत्कार
जिम्नास्टिक : कृष्णा भट्टड, देव गुप्ता, आदित्य चोंधे, हिमांशू जैन, इशिका साखरकर, लक्ष काकडे
जलतरण : जस्मीत कौर राहल, श्रावणी सपाटे, दिशा यादव,
मल्लखांब : श्रेयसी भडांगे, चंदा भातकुलकर, नेहा दारशिंगे
अथेटिक्स : ऋतुजा कवठाळे : सॉफ्टवेअर अर्जुन पंकज माहुरे
या यशस्वी खेळाडूंचा खा. डॉ. अनिल बोंडे यांचेसह व्यासपीठावर उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
———————————————–
विदर्भ प्रजासत्ताक ऑन लाईन वेब न्यूज पोर्टल ला लाईक करा