शहरातील प्रमुख मार्गावर फळे व भाजीपाला विकणाऱ्या हॉकर्स च्या गाड्यांवर कारवाई करा
शहरातील अतिक्रमणाबाबत महानगर चेंबरने पोलीस आयुक्तांना दिले निवेदन
दि.२४वि. प्रजासत्ताक अमरावती
मागील अनेक दिवसांपासून अमरावती शहरातील प्रमुख मार्गावर फळे व भाजीपाला विकणाऱ्या हॉकर्स च्या गाड्या वाढल्या आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरून नागरिकांना चालणे फारच कठीण झाले आहे. त्यामुळे शहरात तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे, तसेच या भागात राहणाऱ्या व व्यवसाय करणाऱ्या ना अपघात व इतर धोक्याचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे फळे व भाजीपाला विकणाऱ्या हॉकर्स च्या गाड्यांवर कारवाई करा अश्या मागणीचे निवेदन आज पोलीस आयुक्तांना देण्यात आले.
अमरावती शहरातील सायन्सकोर मैदान ,काँग्रेस नार रॉड,रुख्मिणी नगर,चौधरी चौक,रॅलीज प्लॉट, इर्विन चौक,कॉटन मार्केट रोड,श्याम चौक, रविनगर चौक, गांधी चौक या भागातील फेरीवाल्यांची स्थिती अत्यंत गंभीर असून बिकट परिस्थिति निर्माण झाली आहे. यासंदर्भात महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना एक निवेदन दिले. सुरेश जैन यांनी पोलीस आयुक्तांना या संदर्भात सांगितले की, अतिक्रमणामुळे या ठिकाणी रोजच जागेच्या वादावरून दुकानदारांशी वारंवार भांडने होतात.विशेषकरून चौधरी चौक, रविनगर चौकातील दुकानदार व रहिवासी फेरीवाल्यांमुळे प्रचंड नाराज आहेत.जेव्हा कधी अतिक्रमणाची कारवाई होते किंवा कारवाईचा सुगावा लागतो, तेव्हा त्यापासून वाचण्यासाठी हे फेरीवाले बळजबरीने रहिवाश्यांच्या आवारात घुसतात. त्यांच्या वाहनांमुळे इतरांचे नुकसान होते,रहिवासिनी याचा विरोध केल्यास शिवीगाळ करतात व धमक्या देतात. या परिसरात शाळकरी मुले व विशेषत मुली नियमित ये जा करतात .त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. चौधरी चौकाच्या पुढे मोरबाग आहे, फेरीवाल्यांमध्ये रोजच्या भांडणामुळे येथे मोठी अनुचित घटना भविष्यात घडू शकते.यामुळे महिलांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागते, या परिसरातील फेरीवाले रात्रि जाताना कुजलेला भाजीपाला, फळे, दुकाने व घरांसमोर टाकतात. आणि रात्रीच्या वेळी नाल्यांमध्ये टाकतात,त्यामुळे नाल्या चोक होतात. नजीकच्या प्रार्थना स्थळांमध्ये अस्वच्छता पसरवतात, त्यामुळे रहिवाशांच्या धार्मिक भावना दुखावतात. फेरीवाल्यांमुळे अस्वच्छता पसरली असून, तुंबलेल्या नाल्यांमुळे दुर्गंधी पसरते.शहरात दिवसेंदिवस फेरीवाले वाढत असून करारावर गाडी देणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली असल्याने, या व्यवसायात काही असामाजिक तत्व सुद्धा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे चोरीच्या घटना फार घडत आहेत.त्यामुळे महानगर चेंबरतर्फे पोलिस आयुक्ताला विनंती करूण फेरीवाल्यांना फेरीवाला झोनमध्ये पाठवावे आणि वरील नो हॉकर्स झोनमध्ये वावरत असलेल्या वाहनांवर कारवाई करून नागरिकांना व दुकानदारांना दिलासा द्यावा, जेणेकरून शहरातील वाहतूक समस्या सुधारून शहरात शांतता नांदेल आणि येथील दुकानदार व रहिवासी सुरक्षित राहतील.पोलीस आयुक्तांना निवेदन देताना अध्यक्ष सुरेश जैन, प्रकाश बोके, बकुल कक्कर, महेश पिंजानी, अर्जुन चांदवानी, ओमप्रकाश चांडक, संजय छांगाणी, अनिल नरेडी, चंद्रकांत पोपट, सुरेंद्र पोफळी, पप्पू गगलानी, कमलकिशोर मालाणी, सर्वेश चौधरी, बबन कापडि उपस्थित होते. चर्चे अंती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी महानगर चेंबरला संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.