वीरपत्नी सरस्वती ओकारराव मासोदकर यांनी केले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ध्वजारोहन
नवनिर्वाचित अध्यक्ष बच्चु कडु यांच्या उपस्थितीत पार पडला स्वातंत्र्य दिन सोहळा
अमरावती
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५ ऑगष्टला ध्वजारोहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी शहिद विर यांच्या पत्नी सरस्वती ओकारराव मासोदकर यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले,
सरस्वती मासोदकर यांचे पती शहीद ओंकार चिंदाजी मासोदकर देशाचे रक्षण करतांना जम्मु कश्मीर येथे आंतकवादी विरोधात लढा देवून १५ जानेवारी १९९५ रोजी शहीद झाले होते. त्या अनुषंगाने शहीदांच्या स्मृतीस उजाळा म्हणुन विर पत्नी सरस्वती ओंकार मासोदकर यांना ध्वजारोहनाचा मान आ. बच्चु कडू यांनी दिला आहे. बँंकेच्या इतिहासात पहील्यांदाच एका वीरपत्नीच्या हस्ते ध्वजारोहन झाले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्याचा ध्वजारोहण सोहळा थाटात पार पडला ,यावेळी वीर पत्नी सरस्वती मासोदकर यांना अध्यक्षांच्या हस्ते साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, या कार्यक्रमाला बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू, उपाध्यक्ष अभिजीत पाटील ढेपे, संचालक रवींद्र गायगोले, अजय मेहकरे, आनंद काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल, बी.बी केकान, बी. एस. खांडे, सुनील ठाकरे, संजय जवंजाळ, नितीन दामले इत्यादी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,