चांदूरबाजार पोलीस स्टेशन मध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!
शहीद शूरवीरांच्या कुटुंबांचा व माजी सैनिकांचा करण्यात आला सत्कार
करण खंडारे चांदूर बाजार.
चांदूर बाजार पोलीस स्टेशन मध्ये ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ७ वाजून १५ मिनीटांनी ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विशेष म्हणजे देशासाठी आहुती देणाऱ्या शहीद वीरांच्या कुटुंबांचा सन्मान आणि माजी सैनिकांचा सत्कार चांदूर बाजार पोलिस स्टेशनच्या प्रांगणात करण्यात आला भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष पूर्ण झाले असून देशभरात ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला याच दिनाच औचित्य साधून चांदूर बाजार पोलीस स्टेशन मध्ये विशेष सन्मानचिन्ह देऊन शहीद वीरांच्या ५ कुटुंबांचा सत्कार करण्यात आला
त्यामध्ये १३ माजी सैनिकांचा सुद्धा सहभाग होता १५ ऑगस्ट वर्ष १९४७ रोजी भारताला स्वतंत्र होवून इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाला त्यामध्ये अनेक जाती-धर्मांच्या स्वातंत्र्यवीर भूमिपुत्रांचा मोलाचा वाटा आहे आणि ७६ वर्षांपासून मिळाल आणि स्वातंत्र जोपासण्याचा काम देशाच्या सीमेवर असलेल्या भूमिपुत्रांनी केल त्यामध्ये अनेक शूरवीर सैनिकांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्याअनूषंगाने यावेळी शहीद शूरवीरांचे कुटुंब १. शाहिद जवान विनोद बाबाराव सोळंके रा.खराळा त्यांच्या पत्नी निकीताताई विनोद सोळंके , २.शहीद जवान प्रकाश भिमराव इंगळे त्यांच्या पत्नी सुनिताताई प्रकाश इंगळे ३.हरीशचंद्र नारायणराव वानखडे रा. तुळजापुर गढ़ी त्यांच्या पत्नी रेणुताई हरीशचंद्र वानखडे ४.प्रभाकर विश्वासराव मोहोड रा . कुरळपुर्णा त्यांचे भाऊ अरूण विश्वासराव मोहोड व ५. पांडुरंग यशवंतराव डींडेंकर त्यांचे भाऊ रामकृष्ण यशवंतराव डींडेकर या शहीद शूरवीरांच्या कुटुंबांचा तसेच चांदुर बाजार तालुक्यातील माजी सैनिक १.धिरजकुमार सु . सातपुते २ .शालिकरामजी पारवेकर ३.गणीभाई सौदागर ४.रावसाहेब दातीर ५.राजाभाऊ गंधे ६ .अनिल डोंगरे ७. शरद गावंडे ८ .श्रीहरी बागडे ९ . प्रशांत नेहटरक १० . राजु मेहरे ११. राहुल वानखडे १२. नंदकुमार भोंगाडे १३.महेंद्र लव्हाडे या माजी सैनिकांच्या सुद्धा सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला यावेळी चांदूर बाजार ठाणेदार सुरज बोंडे यांनी मार्गदर्शन केले व प्रास्ताविक सुत्र संचालन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोंद इंगळे यांनी केले पोलीस अधिकारी स.पो.नी. निखिल निर्मळ,स.पो.नी प्रमोद राऊत, म.स.पो.नी. सारिका राऊत,पो.उप.नि निलेश डांबेराव,पो.उप.नि सिद्धेश्वर उमाळे उपस्थित होते आणि शहिद जवानांचे कुटुंब , माजी सैनिक , प्रतिष्ठीत नागरीक , पत्रकार बंधु , पोलीस स्टेशन चांदुर बाजार येथील सर्व अंमलदार-कर्मचारी मोठया संख्येत उपस्थित होते.