राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अचलपुर महिला कार्यकारिणी जाहीर
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप माजी समाज कल्याणमंत्री यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अचलपूर येथे महिला जिल्हाध्यक्षा राधाताई कुरील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष निलेश जामठे,जिल्हा संपर्कप्रमुख पी.बी.वनस्कर, शिक्षक आघाडीचे विदर्भ अध्यक्ष प्रा.गजानन वानरे,जिल्हा उपाध्यक्ष मनोहर कोथळकर, अचलपूर तालुका अध्यक्ष रामा लाहाळके, चिखलदरा तालुका अध्यक्ष सतिश घोरे,सामाजिक कार्यकर्ते दिलीप तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये महिला कार्यकारणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली.

यामध्ये अचलपूर महीला तालुका अध्यक्षा जयश्री निलेश डामरे,जिल्हा उपाध्यक्षा रश्मी रविंद्र भागवतकर,अचलपूर शहर अध्यक्षा पुष्पा आशिष भागवत,अचलपूर शहर उपाध्यक्षा दिपाली किशोर भागवतकर,अचलपूर शहर सचिव वर्षा गजानन सरोदे,अचलपूर शहर कोषाध्यक्षा वैशाली अमोल डामरे,अचलपूर शहर संघटका अल्का संजय भागवतकर,अचलपूर शहर कार्याध्यक्षा अंजली दिनकर भागवतकर,महिराबपुरा महिला कार्यकारणी मध्ये शाखा अध्यक्षा मोनू चेतन सरोदे,शाखा उपाध्यक्षा मीनाक्षी सुकेश भागवतकर,शाखा सचिव पूजा नरेंद्र गव्हाळे यांना नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.



