आजपासून देशात केंद्र सरकारने लागू केला १९५५ चा ESMA कायदा
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे जगातील तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. घरगुती गॅसच्या रुपाने स्वयंपाकघरातही याची झळ पोहोचली आहे. दरम्यान, घरगुती गॅसचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी अत्यावश्यक वस्तू कायदा (EC कायदा) लागू केला.
काय आहे आदेश?
अधिकृत आदेशानुसार, केंद्र सरकारने रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल युनिट्सना द्रव पेट्रोलियम गॅस (LPG) चे उत्पादन जास्तीत जास्त करण्याचे आणि प्रमुख हायड्रोकार्बन प्रवाह LPG पूलमध्ये वळवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, विशिष्ट क्षेत्रांना नैसर्गिक वायूचा पुरवठा प्राधान्य वाटप म्हणून विचारात घेतला जाणार आहे.



