गुणरत्ने सदावर्ते यांच्या आवाहनाला केराची टोपरी
अमरावती विभागात १०० टक्के बस सेवा सुरु
अमरावती
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहनाला केराची टोपी दाखवीत अमरावती विभागातील आठ हि आगारातून बस सेवा सुरु आहे कुठलेही बस सेवा थांबली नसून सर्व कर्मचारी अधिकारी कामावर हजर झाले आहे. त्यामुळे या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावाही फोल ठरताना दिसतोय.
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहनाला कोणताच प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावाही फोल ठरताना दिसतोय. राज्यभरातील एसटी वाहतूक सुरु आहे. अमरावती विभागातील सकाळच्या सत्रात 100 टक्के वाहतूक सुरु आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सफुर्त संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली. मात्र सदावर्तेंच्या आवाहानाला प्रतिसाद नाही.अमरावती मध्यवर्ती बस स्थानकामधून आज सकाळी सर्व लांब पल्ल्याच्या बसेस वेळेवर रवाना झाल्यात तर जिल्ह्यातील बस सेवा ही सुरळीत सरु आहे.