शासनाच्या जाचक अटी विरोधात कृषी केंद्र धारकांचा एल्गार
चांदूरबाजार तालुक्यातील कृषी केंद्रे बंदचा निर्णय
जाचक अटी रद्द करा,तहसिलदारांना निवेदन
प्रतिनिधी/- सुयोग गोरले
चांदुर बाजार /–
कृषी निविष्ठा विक्री बाबत आधीच कडक कारवाईची तरतुद असतांना आता पुन्हा राज्य शासनाने कायद्यात आणखी दुरुस्ती करुन जाचक अटी लादण्याचा घाट घातला आहे.त्यामुळे कृषी निविष्ठा विक्री करणे कृषी केंद्रांना अडचणीचे ठरणार आहे.या कायद्यातील जाचक अटी रद्द करण्यासाठी कृषी केंद्र संचालकांनी कृषी केंद्र बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून पहिल्या टप्यात २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर पर्यंत राज्यासह चांदूरबाजार तालुक्यातील सर्व कृषी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेथला आहे.यावर शासनाने ठोस निर्णय घेऊन सदर जाचक अटी रद्द केल्या नाही तर भविष्यात कृषी केंद्र बंदचा इशारा कृषी केंद्र संचालक संघटनेने चांदूरबाजार तहसिलदार गीतांजली गरड यांना निवेदन देऊन शासनाला दिला आहे.
कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी, सध्या प्रचलित असलेले कायदे पुरेसे असतानाही, राज्य शासनाकडून विधेयक क्र. ४०,४१,४२,४३ व ४४ नुसार पुन्हा नवीन कायदे तयार करणेची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रेत्यासाठी अतंत्य जाचक आहेत. व त्यामुळे विक्री व्यवसाय करणे अशक्यप्राय होणार आहे. राज्यातील विक्रेते हे कोणत्याही प्रकारच्या कृषी निविष्ठाचे उत्पादन करीत नाहीत. कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त सीलबंद पार्किंगमध्ये खरेदी करून शेतकऱ्यांना सीलबंद पार्किंगमध्ये विक्री करीत असल्याने व कृषी विभाग मान्यताप्राप्त सीलबंद व पकिंगमधील निविष्ठाचे दर्जाबाबत इ. बाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यांत येऊ नये. तसेच योग्य विनिष्ठा विकणारे कृषी निविष्ठा विक्रेत्यावर जरब बसविण्यासाठी अन्यायकारी कायदे विक्रेत्यावर लादू नयेत अशी राज्यातील सर्व विक्रेत्यांची मागणी आहे. याला चांदूरबाजार तालुका कृषी सेवा संचालक संघटनेने पाठिंबा दिला असून बंद मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
चांदूरबाजार तालुका कृषी सेवा संघटनेचे अध्यक्ष विजय निकम, उपाध्यक्ष संदिप औतकर, विजय सोनारे, विकसीत टिंगणे,शुभम चौधरी, ललीत कोठाळे, ऋषिकेश हिवसे, अंकुश देशमुख, दिनेश धाकडे, सुनिल सावरकर, अरविंद वानखडे,विलास खंडारे, सुरेंद्र भुस्कट, गौरव मडघे,प्रशांत मोहने,ओम पोहकार, जिवन शिरस्कर,अनिकेत घोरमाडे आदींच्या उपस्थितीत तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.