ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम येथे भव्य स्नेहसंमेलनाचे आयोजन
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी 26 ते 29 जानेवारी गौरव महोत्सव नियोजन
प्रतिनिधी /-सुयोग गोरले
चांदुर बाजार /- सुसंस्काराचे दान म्हणजे शिक्षण या ओळी संत श्री गुलाबराव महाराज यांनी लिहले त्या ओळी ला जपत ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम मोठ्या प्रेरणेने उंच भरारी घेत तालुक्यांमध्ये शाळेचे नाव मोठे करत आहे 84 विद्यार्थी वर सुरू केलेली शाळा आज 1500 विद्यार्थ्यांवर जाऊन पोचलेली आहे त्या निमित्याने ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम येथे विद्यार्थ्यांचा गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व विद्यार्थी कडून स्पर्धा मध्ये सहभागी करून घेणे हे हे ज्ञानदेव विद्या मंदिर यांचे सुसंस्कार आहे त्या मुळे तालुका मध्ये शिक्षण व सर्व स्पर्धा मध्ये मुलांना मोठ्या संख्येने सहभागी करणे हा मूळ उद्देश शाळेचा राहिला आहे त्या निमित्ताने भव्य स्नेहसंमेलनाचे आयोजन 26 ते 29 जानेवारीला करण्यात आले आहे या मध्ये आज प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते संत सदगुरु गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष रवींद्र इंगोले, प्रमुख पाहुणे डॉ राजेश उमाडे गझलरत्न गायक व संगीतकार, सुभाष तांबे , भागवतराव विधाते,अजय धोटे, गोपल डोंगरे, पत्रकार सुयोग गोरले , मुख्याध्यापीका महानंदा खांडे, मुख्याध्यापिका श्रद्धा पानसे , मुख्याध्यापिका ममता इंगोले व सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी या स्नेहसंमेलना उपस्थित होते