नांदगाव खंडेश्वर येथील शिंगणापूर चौफुलीवर भीषण अपघात,
चार जणांचा जागीच मृत्यू.
तर दहा जण जखमी; जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू
नांदगाव खंडेश्वर
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर येथील अमरावती-यवतमाळ आणि औरंगाबाद – नागपूर या रोडच्या चौफुलीवर रविवारी सकाळी सुमारे सात वाजता भीषण अपघात झाला असून गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झालेली आहे. आजच्या दिवसाची सुरुवात भीषण अपघातानं झालेली आहे. नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर ट्रॅव्हल्स आणि रेडी मिक्स काँक्रिट मिक्सरचा अपघात झाला या घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं अमरावती जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर स्थानिकांनी गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार अमरावती येथील क्रिकेटपटू हे यवतमाळ येथील सुरू असलेल्या एका स्पर्धेसाठी ट्रॅव्हल्सने निघाले होते.नांदगाव खंडेश्वर मार्गे यवतमाळला जात असताना समोरून येणाऱ्या काँक्रीट मिक्सर ट्रक क्र.G.j.39 -T 9353 आणि पिवळ्या रंगाच्या ट्रॅव्हल्स क्र.MH.27- BX 1755 ची समोरासमोर जबर धडक दिली. या धडकेमुळं ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात घडून आला. प्राथमिक माहितीच्या आधारे या अपघातात चार क्रिकेटपटूंचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून इतर दहा क्रिकेटपटूंना नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
——————————————-
*क्रिकेट स्पर्धेला पोहोचण्यापूर्वीच अनर्थ*
——————————————-
अमरावती जिल्ह्यातून हे खेळाडू क्रिकेट स्पर्धेसाठी यवतमाळ जिल्ह्यात निघाले होते.मात्र, स्पर्धेपूर्वीचं या कबड्डीपटूंवर काळानं घाला घातला.या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झालेले आहेत.रेडी मिक्स काँक्रिट मिक्सरच्या धडकेनं हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर झालेल्या अपघातातील जखमींवर प्राथमिक उपचार सुरु आहेत. क्रिकेट स्पर्धेला पोहोचण्यापूर्वीच हा मोठा अपघात घडला.
रविवारी सकाळच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या दिवसाची सुरुवात भीषण अपघातानं झालेली आहे. या घटनेनं अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर स्थानिकांनी गर्दी केली होती.मृकामध्ये श्रीहरी राऊत,आयुष बहाळे,सुयश अंबर्ते,आणि संदेश पाडर यांचा समावेश असून गंभीर जखमी मध्ये प्रज्वल बुचे, लौकिक पायमासे,मयूर नागपुरे,मंगेश पांडे आणि हरीश ढगे यांचा समावेश आहे तर जखमी मध्ये भूषण पिवस्कर,प्रज्वल कोचे,प्रणय येवतिकर,धीरज राऊत,वेदांत आखरे, सौरभ कुंमरे,ओम् अटाळकर,हरिओम लुंगे,भूषण पाडर,जय देशमुख,अक्षय चौधरी,संकेत चावडे, अनिरुद्ध आकरे,सुबोध डहाके,राहील कटरे, यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके,सहा.ठाणेदार,अमोल तुळजेवार,सहा.ठाणेदार,प्राजक्ता नागपुरे, हेकॉ.गणेश खंडारे,हेकॉ.विवेक राणे, हेकॉ. प्रफुल्ल शहारे,हेकॉ. स्वप्निल गवई,हेकॉ. सतीश गावंडे,कॉन्स्टेबल निखिल मेटे करीत आहेत.
@विदर्भ प्रजासत्ताक
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात प्रथम वाचा आमच्या सोबत