विरूळ रोंघे येथे दोन मुलीचा मृत्यू
विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज चिमुकल्यावर सुरू आहे उपचार
दि.५विदर्भ प्रजासत्ताक
विरुळरोंघे
विरूळ रोंघे येथे दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना सकाळी घडली आहे. तर एक चिमुकल्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे .दिनांक 5/7/ 2024 रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान नंदनी प्रवीण साव वय वर्ष 10 तर चैताली राजेंद्र साव या मुलींची अचानक सकाळी तब्येत मध्ये बिघाड झाला. तेव्हा नंदिनी हिचा घरीच मृत्यू झाला होतं व चैताली वय 6वर्ष हिला धामणगाव येथे उपचाराकरिता नेत असताना तिने सुद्धा तिचे प्राण सोडल्याची दुःखद घटना तालुक्यात विरूळ या गावी झाली आहे. तसेच चार वर्षीय देवांशू राजेंद्र साव या मुलावर सुद्धा धामणगाव रेल्वे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे .खाण्यामधून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे .दोन्हीही मुलींच्या मृत्यूने गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सविस्तर बातमी लवकरच अपलोड होत आहे
@विदर्भ प्रजासत्ताक
@विदर्भ प्रजासत्ताक