धारगड यात्रेला उद्या पासून सुरुवात:सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये गुंजणार हर हर महादेवाचा गजर
विदर्भ प्रजासत्ताक
दि. ८ मेळघाट/अमरावती
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात असलेल्या धारगड येथील महादेव यात्रेला श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला सुरवात होणार असून शिवभक्त ‘हर हर बोला महादेव’चा गजर करत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत याहीवर्षी हजारोंच्या संख्येने दाखल होणार आहेत.निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्माचा सुरेख संगम असलेल्या या धारगड यात्रा महोत्सवाला दि १८ ऑगस्ट २०२४ पासून सुरवात होणार १९ तारखेला सायंकाळी ६ वाजेपर्यंत मंदिर परिसर तसेच खटकाली नाका येथून भाविक-भक्तांना बाहेर पडणे बंधनकारक राहणार आहे. सातपुडय़ाच्या पर्वतरांगांमध्ये ३ हजार फूट उंचीवर नरनाळा किल्ल्याच्या छातीशी वसलेले धारगड येथील शिवमंदिरात चारकोनी गुहा असून त्यात दोन स्वयंभू शिवलिंग व नंदी आहे.धारगड अकोटवरून पाऊल वाटेने सुमारे २५ कि.मी. तर प्रमुख मार्गाने ३७ कि.मी. दूर येते. बहुतांश शिवभक्त पाऊल वाटेनेच जात जलाभिषेक करणार आहेत. दरम्यान, धारगड मोहोत्सवाकरिता प्रशासनही सज्ज झाले असून, यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना प्रचलित नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात्रे दरम्यान कोणतेही वाद्य (ढोल, ताशे डफडे. इ.) लाउड स्पिकर वापरण्यास तसेच सोबत बाळगण्यास प्रतिबंध राहणार असून, तत्सम साहित्य आढळून आल्यास जप्त करण्यात येणार आहे. तसेच तंबाखु गुटखा, बिडी, मद्य आदी नशेचे पदार्थ व शस्त्र वापरण्यास व सोबत नेण्यास बंदी राहणार आहे. खटकाली तपासणी नाक्याकडून दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाज्रेपर्यंत भाविकांना प्रवेश राहणार आहे. त्यानंतर कोणत्याही वाहनास प्रवेश देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.