
चारगड नदीवरील पुलाचे कठड्याला धडक देत ट्रक पडला ५०फूट खोल नदीत
@ विदर्भ प्रजासत्ताक
मोर्शी /वरुड
दत्तराज इंगळे / संजय गारपवार
निंभी दरम्यान चारगड नदीवरील पुलाचे कठड्याला धडक देवून अंदाजे 40-50 फूट उंचावरून ट्रक नदीच्या पात्रात पडून काही अंतरावर वाहून जावून नदी काठच्या झाडात अडकून दिसला असता यामध्ये ट्रक चालकाचे प्राण वाचले व जोडीदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक बुलढाणा जिल्ह्यातील गोरेगाव येथून बिहार राज्यातील पटना येथे मिरची घेऊन जात असलेला आयशर ट्रक क्र. एम.एच. 40 सि.डी. 6800 दी. 19 ऑगस्ट च्या मध्यरात्री सुमारे 1:30 वाजताच्या दरम्यान पुलावरून जात असता चालकाचा वाहणावरून ताबा सुटल्याने अमरावती – मोर्शी मार्गावरील चारगड नदीच्या पुलावरून खाली कोसळला यामध्ये चालक विनोद सुरेश भावरकर वय 34 रा. छिंदवाडा मध्यप्रदेश व क्लिनर शशिकांत डेहरिया वय 24 हथनापूर मध्यप्रदेश असे दोन व्यक्ती ट्रक मध्ये होते.
सदर ट्रक नदी पात्रात अडकलेल्या असता त्याला लागून असलेल्या शेतात निंभि येथील शेतकरी शिवदास नागोराव ठाकरे वय 62. वर्ष हे गुरे शेतात असल्यामुळे शेतात होते यांना चालकाचा मध्यरात्री ओरडण्याचा आवाज आला असता शेतकरी घटनास्थळी पोहोचले असता त्यांना नदीच्या पात्रात ट्रक दिसून आला त्यामध्ये चालक अडकून पडलेला दिसला असता शेतकऱ्याने निंभी येथील माजी सरपंच बंडू शेषराव ठाकरे यांना फोन करून घटनास्थळी मदतीला बोलावून दोघांनीही व शिरखेड पोलिसांनी प्रयत्न करून ट्रक चालकाचे प्राण वाचविण्यात शेतकऱ्यांच्या मदतीने पोलिसांना यश आले. शिरखेड पोलिसांना 112 क्रमांकावर कॉल आला असता शिरखेड पो.स्टे. ठाणेदार सचिन लुले कर्मचारी हे.कॉ. रमेश नेवारे, पो.कॉ. राहुल सूंडे , चालक अरुण श्रीनाथ , महिला चालक विजया वानखडे सह मध्यरात्री घटनास्थळावर शिरखेड पोलिस हजर झाले असता ठाणेदार सचिन लुले यांनी रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले असता मध्यरात्री पासून ट्रकच्या क्लिनर चा रेस्क्यु टीम शोध घेत आहे. वृत्त लीहेस्तोर रेस्क्यू टीमला अजून पर्यंत यश आलेले नाही. घटनास्थळावर आज सकाळ पासून शिरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले , दुय्यम ठाणेदार राहुल गवई , ए.एस.आय. किसन धूर्वे , शकुर शेख , पुंजाराम मेटकर, विनोद मनोहरे , पंजाब केकन व इतर कर्मचारी हजर होते.