‘घरात लग्न झालं नाही तरीही फडणवीसांचा राजीनामा मागतील’, नितेश राणेंचा ठाकरेंना टोला
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२६मुंबई
राज्यात सध्या महिलांवर होणाऱ्या आत्याचारावरून सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. बदलापूरच्या धक्कादायक घटनेनंतर विरोधक महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागत आहे. यातच आज माध्यमांशी बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी जर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या घरात लग्न झालं नाही तरीही हे लोक फडणवीस यांचा राजीनामा मागतील अशी टीका केली आहे तसेच पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, आज सकाळी ठाकरे गटातील दोन नेत्यांची वक्तव्य ऐकूण येथे आलो आहे, एक आहे आदित्य ठाकरे आणि दुसरे संजय राजराम राऊत आहेत. हे दोघेही महिला अत्याचार आणि विकृती आणि पोलिसांवर दबाव याबद्दल बोलत होते मात्र त्यांचे चारित्र्य पाहिलं तर त्यांनी फक्त महिला अत्याचार आणि विकृतीमध्ये पीएचडी मिळणे राहिले आहे अशी टीका माध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी केली.पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, आज सकाळी संभाजीनगरमध्ये झालेला आंदोलन हे कोणत्या राजकीय पक्षाने केले नव्हता पण आमचे भाजप पदाधिकारी हे माणसांच्या मनातील प्रश्न विचारायला तिथे गेले होते त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी पळ काढण्यापेक्षा बाहेर येऊन जोरात सांगायला पाहिजे दिशा सालियन प्रकरणाशी काहीही संबंध नाही कारण की मी त्या ठिकाणी नव्हतो. आदित्य ठाकरे त्या ठिकाणी आले असते तर त्यांच्या पक्षातील लोकांना लाठी खायला लागली नसती असं देखील यावेळी नितेश राणे म्हणाले. तसेच जर आदित्य ठाकरे यांनी पुरावा दिला तर मी ह्या ठिकाणी त्यांची माफी मागायला तयार आहे असेही यावेळी ते म्हणाले.
दिशा सालियान व सुशांत सिंग राजपूत हे राजकीय प्रकरण नाही. भांडूपचा देवानंद याचे स्वत:चे नाव डॉ. स्वप्ना पाटकर यांना शिवी देण्यामध्ये आहे. संजय राऊत यांनी डॉ. पाटकर यांच्यावर सुद्धा बोलावे. डॉ. स्वप्ना पाटकर हिला संजय राऊतची माणसे फोन करु सांगत आहेत की या प्रकरणात तु देवेंद्र फडणवीस यांचे नाव घे असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.