बाप्पांच्या प्रतिष्ठापनेचे उद्या केवळ तीनच योग्य मुहूर्त;
७ सप्टेंबर रोजी भाद्रपद गणेश चतुर्थी आहे. या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाईल. यासाठी दिवसभरात ३ शुभ मुहूर्त सांगितले आहेत. सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. गणेश पुराणानुसार, गणपतीचा जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्राच्या मध्यरात्री म्हणजेच दिवसाच्या उत्तरार्धात झाला होता. हा शुभ काळ सकाळी ११.२० पासून सुरू होणार आहे.
यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी सुमुख नावाचा शुभ योग तयार होत आहे. सुमुख हेदेखील गणपतीचे एक नाव आहे. तसेच पारिजात, बुधादित्य आणि सर्वार्थसिद्धी योग तयार होत आहे. या संयोगाने गणपती स्थापनेचे शुभ परिणाम आणखी वाढणार असल्याचे चिन्ह आहे, असे मत ज्योतिष तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
स्त्रानुसार गणेशाची अनेक रूपे आहेत, परंतु भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला सिद्धी विनायकाच्या रूपात गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. या गणेशमूर्तीमध्ये उजवा दात तुटलेला असून डावा दात संपूर्ण आहे. बाप्पाने यज्ञोपवित धारण केले आहे आणि सर्पाचा मेखला बांधला आहे. बाप्पा सुखासनात बसलेला आहे. एक हात आशीर्वादाचा, दुसऱ्या हातात अंकुश (शस्त्र) असते. तिसऱ्या हातात मोदक आणि चैथ्या हातात रुद्राक्षाची जपमाळ. बसलेली मूर्ती लाल रंगाची असून तिच्या डोक्यावर मुकुट आणि गळ्यात हार आहे. हा गणेश सुख-समृद्धी देतो. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी त्याची पूजा केली जाते. जो प्रत्येक कामाचे शुभ फल वाढवतो. म्हणूनच त्यांना सिद्धी विनायक म्हणतात.
गणेशपूजेत कोणती फुले व पाने वापरावीत : जाटी, मल्लिका, कणेर, कमळ, गुलाब, चंपा, झेंडू, मौलश्री (बकुळ) पाने : दुर्वा, शमी, धतुरा, कणेर, केळी, बेर, मंदार आणि बिल्वपत्र
गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त : सकाळी ८ ते ९.३०, दुपारी ११.२० ते १. ४०, संध्याकाळी २ ते ५.३० असा आहे.
गणेश पुराणानुसार गणेश पूजेची पद्धत : तुपाचा दिवा लावा, दूध आणि पंचामृताने स्नान घाला आणि अष्टगंध व लाल चंदनाने गणेशाला टिळा लावा. हार फुले आणि पाने तसेच मोदकाचा नैवेद्य दाखवा. जेवून झाल्यावं विडा म्हणून लवंग, वेलची, केशर, कापूर, सुपारी आणि काचू असलेली सुपारीची पाने अर्पण करा. आरती करून स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला आणि देवाला मनोभावे नमस्कार करा.