भाजप ने राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत पोस्टर जाळले
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील विधानावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून शहरातील भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला.शहर आणि ग्रामीण भाजप असे दोन वेगवेगळे आंदोलने आज कऱण्यात आली
येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. नंतर राहुल गांधी यांच्या प्रतिमेची जाळपोळ करण्यात आली. आरक्षणविरोधी भूमिका कॉंग्रेसने घेऊ नये, अन्यथा भाजप त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा भाजप अनुसूचित जाती सेलचे सिद्धार्थ वानखडे यांनी दिला. यावेळी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी उपस्थित होते.भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु, असे राहुल गांधी म्हणाले होते. अमेरिकेत राहुल गांधींनी आरक्षणावरुन हे वक्तव्य केले, मात्र त्यांच्या या वक्तव्याचे देशात आता पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी पक्षाने त्यांना यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करीत आहेत. आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आला असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मतांसाठी आरक्षणावरुन कसा खोटा नॅरेटिव्ह केला हे राहुल गांधींच्या वक्तव्यातून दिसले असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसची खरी आणि संविधान विरोधी भूमिका राहुल गांधींच्या तोंडून आता समोर आली आहे, अशी टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे. त्यांच्या वक्तव्याचा भाजपकडून राज्यभर निषेध केला जात आहे.यावेळी राहुल गांधीचा विरिधात घोषणा देत जोरदार निषेध करत आरक्षण विरोधी भूमिका काँग्रेसने घेऊ नये अन्यथा भाजपा त्यांना फिरू देणार नाही असा इशारा भाजप अनुसूचित जाती सेलचे सिद्धार्थ वानखडे यांनी दिला.