अजितदादांचे 25 शिलेदार ठरले? कुणाचं तिकीटं झालं कन्फर्म..
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१३मुंबई १४
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांत फूट (Maharashtra Assembly Elections) पडल्यानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. अजित पवारांचा पक्ष महायुतीत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जागावाटपातच राजकीय पक्षांची खरी अग्निपरीक्षा होत असेत. यातच पक्ष नेतृत्वाचाही कस लागतो. या गोष्टींची जाणीव नेतेमंडळींनाही आहे. त्यामुळे जागावाटपाचा फायनल निर्णय येण्याआधीच महायुतीत दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. आता सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यातून महायुतीतील शिंदे गट आणि भाजपाचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत 25 उमेदवारांची नावं जवळपास फायनल करण्यात आली आहेत. जागावाटपही लवकरच पूर्ण होणार आहे. यावर चर्चा सुरू आहे मात्र तयारी असावी यादृष्टीने आतापासून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. या उमेदवारांनाच तिकीट दिलं जाईल असे सांगितले जात आहे. यादी अजून बाहेर आलेली नाही. या यादीत 25 मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची याची नावं आहेत. बाारामती मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार असा प्रश्न यंदा निर्माण झाला आहे. हा प्रश्न कदाचित निर्माणही झाला नसता. मात्र अजित पवार यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण झाला होता. अजित पवारांऐवजी दुसऱ्या कुणाला संधी मिळणार का असा प्रश्न लोकांच्या मनात येत होता.
परंतु, अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारामती मतदारसंघातून पुन्हा अजितदादांचंच नाव निश्चित झालं आहे. त्यामुळे बारामतीतून दुसऱ्या कुणाला तिकीट मिळणार का? हा प्रश्न आता मिटला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. या यादीत राज्यातील आणखीही काही मतदारसंघ आहेत. ज्याठिकाणी अजित पवारांनी आपल्या शिलेदारांची नाव निश्चित केल्याचे समजते.
हे पण बातमी वाचा … प्रचाराच्या नियोजनापासून सर्व जबाबदारीसाठी भाजपाच्या सहा शिलेदारांची निवड
कोण असतील राष्ट्रवादीचे संभाव्य २५ उमेदवार?
या यादीवर नजर टाकल्यास लक्षात येते की अजित पवार गटाने जुन्या अन् विश्वासू शिलेदारांनाच संधी दिली आहे. आंबेगाव मतदारसंघातून विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तसेच येवला मतदारसंघातून छगन भुजबळ, वाईमधून मकरंद आबा पाटील, परळीतून धनंजय मुंडे, रायगडमधून आदिती तटकरे, मावळमधून सुनील शेळके, अहेरीतून धर्मराव बाबा आत्राम, खेडमधून दिलीप मोहिते पाटील, जुन्नरमधून अतुल बेनके .यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
उदगीरमधून संजय बनसोड, दिंडोरीमधून नरहरी झिरवळ, पुसदमधून इंद्रनील नाईक, पिंपरीतून अण्णा बनसोडे, इंदापूरमधून दत्ता भरणे, कळवण मतदारसंघातून नितीन पवार, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघातून अनिल पाटील, कागलमधून मंत्री हसन मुश्रीफ, नगर जिल्ह्यातून आमदार संग्राम जगताप आणि वडगाव शेरी मतदारसंघातून आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.