शेतमालावरील आयात निर्यात शुल्कात बदल
अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचा जल्लोष
प्रधानमंत्री मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१४ अमरावती:
केंद्र सरकारने शेतमालावरील आयात निर्यात शुल्कात बदल करण्याचा क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. भाजप नेते तथा राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी अमरावतीच्या चांदुररेल्वे मार्गावर मोठा जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे अनिल बोंडेसह शेतकऱ्यांनी आभार मानले. केंद्र सरकारने खाद्यपदार्थांवरील आयात निर्यात शुल्कात बदल केल्यामुळे महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात विदर्भातील सोयाबीन, कापूस, कांदा, बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे विशेष लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी सरकारने घेतलेला हा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय आहे, असे अनिल बोंडे यांनी स्पष्ट करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानण्यात आले.
हि पण बातमी नक्की वाचा — दहा वर्षांनंतर बाळ झाले, बारसे आटोपून जाताना अपघातात अमरावतीच्या बाळासह आई-आजीचा मृत्यू
ऐतिहासिक, क्रांतिकारी निर्णय : डॉ. अनिल बोंडे
विदर्भात शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, कांदा इत्यादी पिकांचे उत्पन्न घेतो. केंद्राने खाद्यपदार्थांवरील आयात निर्यात शुल्कात बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने हा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हजारो शेतकऱ्यांकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत असल्याची माहिती माजी कृषिमंत्री तथा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी यावेळी दिली.