कंत्राटी शिक्षक पद्धतीला ग्रामस्थांचा व शिक्षक संघटनांचा विरोध
भावी शिक्षकांचे भविष्य अंधारात; अनेक शाळांना फटका बसण्याची शक्यता
अमरावती जिल्हात ३८०शाळा २०पटाच्या खाली
विदर्भ प्रजासत्ताक
दि१४अमरावती 14
राज्यात जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड., बी.एड. अर्हताधारक उमेदवार कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्याच्या निर्णयाला शिक्षक संघटनेबरोबरच ग्रामस्थ आणि सुशिक्षित बेरोजगार यांचा तीव्र विरोध होत आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी शासनाने घेतलेला हा निर्णय रद्द करण्याची मागणी होत आहे.
शासनाच्या या निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होत नाहीत, अशा ठिकाणी पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ क्षेत्र असलेल्या तालुक्यातील शाळांना या निर्णयामुळे मोठा फटका बसणार असण्याची शक्यता आहे. तसेच या निर्णयाने शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांवर अन्याय होणार आहे. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली आहे. बेरोजगारी वाढत चालल्यामुळे सुरक्षित बेरोजगारांच्या मनाचे संतुलन बिघडले असून भावी शिक्षकांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे.अमरावती जिल्हात १४तालुक्यात ३८०शाळा ह्या २०पटसंख्येच्या खाली आहे.या शासन निर्णयामुळे दोन शिक्षक कार्यरत असलेल्या शाळेवरील एका शिक्षकाची बदली होणार असुन त्याला इतर शाळेवर नियुक्त केले जाणार आहे.त्यांच्या जागेवर सेवानिवृत्त शिक्षक कींवा डी.एड.धारक यांची कंञाटी नेमणुक करण्यात येणार आहे.हा बेरोजगार युवकांवर अन्याय आहे.
कमी पटसंख्येच्या नावाखाली नियमित शिक्षकालाच हद्दपार करायचे अशा प्रकारचा निर्णय शासनाने शिक्षक दिनीच घेतला. हा निर्णय शिक्षकांच्या अस्मितेलाच धक्का देणारा, कमी पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवतेसाठी मारक आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे.आज पुणे येथे राज्यातील सर्व शिक्षक संघटनेची सभा होत असुन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
-राजेश सावरकर, राज्य प्रसिध्दी प्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती