दहा वर्षांनंतर बाळ झाले, बारसे आटोपून जाताना अपघातात अमरावतीच्या बाळासह आई-आजीचा मृत्यू
संभाजीनगरच्या लिंबेजळगाव अपघात; मृत तिघे अमरावतीचे
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१४ अमरावती
दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आजी आणि आईसह दीड महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना शुक्रवारी (१३ सप्टेंबर) दुपारी ४ च्या सुमारास संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ घडली.
अमरावती येथील अजय बेसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना लिंबेजळगाव येथे हा अपघात झाला. मृणाली अजय देसरकर (३६, रा. अमरावती),आशालता हरिहर पोपळघट (६४) व अमोघ देसरकर (दीड महिने) अशी मृतांची नावे आहेत, तर अजय देसरकर गंभीर झाले. अजय हे पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांची पत्नी मृणाली दोन महिन्यांपासून गावाकडे आली होती. चार दिवसांपूर्वी त्यांच्या नवजात मुलाच्या बारशाचा कार्यक्रम आटोपून ते पुण्याला जात असताना लिंबेजळगाव परिसरात छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून दुभाजक चढून त्यांनी देसरकरांच्या कारला जोरदार धडक दिली. यात कारमधील चौघे जखमी झाले. जखमींना नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मृणाली, आशालता व दीड महिन्याच्या अमोधला मृत घोषित केले.
हे पण बातमी वाचा … गणेश विसर्जन, ईदनिमित्त स्वच्छतेसाठी मनपात अधिकारी, कर्मचाऱ्यांना शपथ
पोलिसांनी दोघांनाही केली अटक
दरम्यान, पोलिसांनी फरार झालेल्या दोघांचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. विशाल ऊर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय २२, रा. बकवाल नगर वाळूज, ता. गंगापूर), कृष्णा कारभारी केरे (वय १९, बकवाल नगर वाळूज) अशी आरोपींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव चव्हाण हा चालक होता. पण, त्याने लायसन्स नसताना आणि मद्यपान केलेल्या कृष्णा केरे याला गाडी चालवायला दिली. भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

आनंद काळाने हिरावला
अजय व मृणाली यांना दहा वर्षांनंतर बाळ झाल्याने त्यांनी मोठ्या आनंदात बारशाचा कार्यक्रम केला. पुण्यात मृणाली व बाळाची काळजी घेण्यासाठी अजय यांनी त्यांच्या सासू आशालता पोपळघट यांना सोबत नेत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या अपघाताची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली.
—————-