गणेश विसर्जन, ईदनिमित्त स्वच्छतेसाठी मनपात अधिकारी, कर्मचाऱ्यांना शपथ
सामान्य नागरिक म्हणतात नुसत्या शपथा घेऊन काय फायदा?
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१४ अमरावती
स्वच्छ सर्वेक्षण २०२४, स्वच्छता ही सेवा २०२४, गणेश विसर्जन तसेच ईदच्या अनुषंगाने महापालिका उपआयुक्त (प्रशा.) डॉ. मेघना वासनकर यांच्या अध्यक्षतेत राजापेठ झोन क्रमांक २ येथे घेण्यात आलेल्या सभेत १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत उपायुक्त डॉ. वासनकर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.मात्र यावर सामान्य नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया देत नुसत्या शपथा घेऊन काय फायदा?खरोखरच हे अधिकारी प्रामाणिकपणे काम करतील का असा सवाल उपस्थित केला .
हे पण बातमी वाचा … मेंढपाळ धनगरांना मिळवून देणार विविध योजनांचा लाभआ. बच्चू कडू यांचा उपक्रम
मनपा मुख्यालय, झोन कार्यालय, मनपा आरोग्य केंद्र येथे स्वच्छतेची शपथ घेऊन सर्व कार्यालयाची साफसफाई करणे, गणेश विसर्जन स्थळी, तलाव, पर्यटन स्थळावर शून्य कचरा कार्यक्रम राबवणे व सर्व मनपा आरोग्य केंद्र सफाई मित्र सुरक्षा शिबिर, आरोग्य शिबिर, लसीकरण शिबिर आयोजित करणे, मार्केट व व्यावसायिक क्षेत्र येथे झोन निहाय युद्धस्तरावर प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्याचे निर्देश मनपा उपायुक्तांनी दिले.
सर्व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक व स्वास्थ्य निरीक्षकांनी गणेश विसर्जन व ईद निमित्त प्रभागातील सर्व ठिकाणी नाल्या बुडापासून स्वच्छ कराव्यात. १०० टक्के कचरा संकलन करून घ्यावे. परिसरातील घरोघरी घंटागाडी जायलाच हवी. या सर्व बाबींबद्दल योग्य नियोजन करून साफ सफाई करून घेण्याचे निर्देश मनपा उपायुक्तांनी दिले. या बैठकीला सहायक आयुक्त भूषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, राजू डिक्याव, विजय बुरे, कुंदन हडाले, शारदा गुल्हाणे, राजेश राठोड, स्वच्छ भारत अभियान अमरावती शहर समन्वयक डॉ. श्वेता बोके, सर्व स्वास्थ निरीक्षक उपस्थित होते.
————————————————-