मेंढपाळ धनगरांना मिळवून देणार विविध योजनांचा लाभ
आ. बच्चू कडू यांचा उपक्रम –
उद्याला अचलपूर येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१४अमरावती
भटक्या जमाती व मेंढपाळ धनगर समाजासाठी राज्य सरकार मार्फत विविध योजना राबविल्या जातात .परंतु या संदर्भात योग्य माहिती नसल्यामुळे खरे व गरजू लाभार्थी योजनांपासून वंचित राहतात ,ही बाब लक्षात घेता अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बच्चू कडू यांनी भटक्या तसेच मेंढपाळ धनगरांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने या योजनांची माहिती देण्यासाठी तसेच लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या दि १५ सप्टेंबर रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मील कॉलोनी अचलपूर येथील प्रहार कार्यालय येथे सकाळी 11 वाजता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भटक्या जमाती तसेच मेंढपाळ धनगर व तत्सम जमाती मधील गरजू लाभार्थ्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित मेळाव्याला आमदार बच्चू कडू ,पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके आदी अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. या सोबतच पशुपालनामध्ये उत्कृष्ट काम करणारे पशुपालक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
हि पण बातमी वाचा .. 132 माजी सैनिकांची 5 कोटी 40 लाखांची फसवणूक
प्रहार संघटनेच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांकडे न्यायाची मागणी
प्रहार संघटनेच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांकडे न्यायाची मागणी
सर्व योजनांची अर्ज प्रक्रिया एका छताखाली
भटक्या तसेच मेंढपाळ धनगर लोकांसाठी राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत राजे यशवंतराव होळकर महामेष योजना ,चराई अनुदान, कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान, शेळी मेंढी पालनासाठी जागा खरेदी अनुदान अशा विविध योजना राबविल्या जात असून या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांकडून शिबिरामध्येच ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे .सर्व योजनांची अर्ज प्रक्रिया एकाच छताखाली होणार असून या शिबिरात मेंढपाळांच्या समस्या व त्यांचे निवारण देखील आमदार बच्चू कडू व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळावा- आ. कडू
मेंढपाळ धनगर या भटक्या जमातीच्या लोकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून गरजू लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अचलपूर, चांदूरबाजार व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लाभार्थ्यांनी उपस्थित राहून योजनांचे संपूर्ण अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.