132 माजी सैनिकांची 5 कोटी 40 लाखांची फसवणूक
प्रहार संघटनेच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांकडे न्यायाची मागणी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१३अमरावती
132 माजी माजी सैनिक व त्यांच्या नातेवाईकांची तब्बल 5 कोटी 40 लाखांनी फसवणूक झाल्याचं प्रकरण अमरावती समोर आलं आहे. सुधीर चक्रे नामक इसमाने या सर्व माजी सैनिकांची फसवणूक केल्याचा आरोप असून तो स्वतः देखील एक माजी सैनिक असल्याची माहिती आहे. फसवणूक झालेल्या सर्व माजी सैनिकांनी आज प्रहार संघटनेच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली.
हि पण बातमी नक्की वाचा … ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ अभियानाचे बदलले निकष
सुधीर चक्रे नामक हा माजी सैनिक 2020 पासून या माजी सैनिकांच्या संपर्कात होता. सामूहिक व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असल्याचे सांगून सुधीरने या माजी सैनिकांकडून रक्कम गोळा केली. एक लाख रुपये पासून ते 19 लाख रुपयांपर्यंत रक्कम या 132 माजी सैनिकांनी सुधीर कडे जमा केली. काही दिवस सुरळीत परतावा दिल्यानंतर पैसे परत करण्यास नकार दिला असं पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात सुधीरची पत्नी आणि मुलाचाही सहभाग असल्याचे या माजी सैनिकांनी सांगितले.पैसे परत मागितले असता, “माझ्याकडे परवानाधारक बंदूक आहे तसेच माझे बंधू पोलिसात आहेत, तुम्हाला जे करायचं आहे ते करून घ्या”. अशी धमकी सुधीर चक्रे देत असल्याचेही पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगण्यात आले आहे.