खासदार अनिल बोंडे यांच्या जिभेला डागण्या देण्याची वेळ, तिवसा तालुका महिला काँग्रेस आक्रमक
तिवसा
भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांच्या जिभेला आता डागण्या देण्याची वेळ आली आहे. तिवसा विधानसभा मतदार संघामध्ये एक महिला अत्यंत धडाडीने काम करते आहे, हे पाहवत नसल्याने अनिल बोंडे यांच्याकडून आमदार ॲड.यशोमती ठाकूर यांची बदनामी केली जात आहे. अशा नेत्याला आता आम्ही सोडणार नाही असे म्हणत महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले.
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत तिवसा तालुका महिला काँग्रेसच्या वतीने आज तिवसा येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. खासदार बोंडे हे नेहमीच अत्यंत भडकाऊ वक्तव्य करत असतात. त्यांच्या जिभेला लगाम नाही. राहुल गांधी यांच्या विषयी आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या विषयी ज्या पद्धतीने ते बेताल वक्तव्य करत आहे ते पाहता त्यांना धडा शिकवण्याची आणि प्रसंगी जिभेला डागण्यात येण्याची ही वेळ आहे, अशा भावना महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वतीने अनेक विकास कामे केली जात आहेत. तिवसा मतदारसंघांमध्ये आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी केलेला कामाचा धडा आणि त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून बोंडे यांच्या पोटात दुखत आहे. मात्र त्यांच्या या निंदनीय वक्तव्याचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो जनता त्यांना आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी महिला कार्यकर्त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.
हि बातमी पण वाचा — काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
यावेळी रुपाली काळे, कल्पना दिवे, रोशनी पुनसे, प्रिया विघ्ने, संगीता राऊत, अर्चना राऊत, अर्चना भोबे, उषा चौधरी, सावित्री वाघमारे, सविता धानोरकर, जयश्री आबूलकर, आशाताई प्रधान, कल्पना अग्रवाल, सोनूताई आमले, कल्पना राजूरकर, संगीता ढोले, छाया कडू, मंदा शेंडे, स्वेता गावंडे, कल्पना गावंडे, शहीदबी शहा, मालता गडलिंग, शारदा अधम, कल्पना खडसे, चंदा मनवर,छाया आसोडे, रंजना कोल्हे, सुमन शापामोहन, सुनीता चौधरी, बारके ताई, अमृता चौधरी अन्नपूर्ण चौधरी, सुषमा पावडे, सीमाताई कठाणे इत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
ताज्या बातम्यांचे अपडेट साठी आत्ताच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा
आता आपल्या मोबाईलवरच दररोज वाचा सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक