जिल्ह्यातील १४ महाविद्यालयांत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० सप्टेंबर रोजी ऑनलाईन उद्घाटन
कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यातील महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक- युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्यादृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील एक हजार महाविद्यालयांमध्ये तसेच अकोला जिल्ह्यातील १४ महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या केंद्राचे दि. २० सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.
अकोला येथील श्रीमती. महेरबानू कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, श्रीमती. राधादेवी गोयंका कॉलेज फॉर वुमन, मांगीलालजी शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीमती. पंचफुलादेवी पाटील कॉलेज ऑफ सोशल वर्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता व समाजकार्य महाविद्यालय अकोला आणि गुरुकृपा महाविद्यालय तसेच श्रीमती. कमलाबाई देशमुख, कान्हेरी सराप, बार्शीटाकळी, डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव (तेल्हारा), श्रीमती. लक्ष्मीबाई दामोदर नेरकर कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हिंगणा म्हैसपूर, श्री. जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव, एल. एन. आर्टस कॉलेज, वाडेगाव, मनोहर नाईक सायन्स आणि कला ज्युनियर कॉलेज महान, बार्शीटाकळी, जय हिंद महाविद्यालय, मूर्तिजापूर आणि कै. दादासाहेब देशमुख कॉलेज ऑफ डिप्लोमा इन लाइव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन मुंडगाव या एकूण १४ महाविद्यालयांचा समावेश आहे.
हि बातमी पण वाचा — काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी दिनांक १८ सप्टें २०२४ रोजी व्हीसीद्वारे संवाद साधून ऑनलाईन उद्घाटन तयारीचा आढावा घेतला. तसेच उद्घाटन कार्यक्रमासाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला व निवड झालेल्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.
महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून जास्तीत जास्त उमेदवारांनी महाविद्यालयांमध्ये नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच दि. २० सप्टेंबर रोजी मा. प्रधानमंत्री महोदय यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमास त्या त्या महाविद्यालयांच्या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचे सहाय्यक आयुक्त प्र. सु. शेळके यांनी केले आहे.
ताज्या बातम्यांचे अपडेट साठी आत्ताच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा
आता आपल्या मोबाईलवरच दररोज वाचा सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
आता आपल्या मोबाईलवरच दररोज वाचा सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक