अमरावती आगाराचे सकाळचे वेळापत्रक कोलमडले
भोपाळ,जालना,पंढरपूर सह अनेक लांब पल्ल्याच्या बसेस रद्द
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२० अमरावती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवार (दि. २०) वर्धेत येणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या अमरावती जिल्ह्यातून ३२० पैकी तब्बल १७० बस वर्धेत पाठवल्या आहेत. त्यामुळे केवळ १५० बस नियमित प्रवाशांसाठी गुरुवारी जिल्ह्यात उपलब्ध होत्या. बसची संख्या कमी असल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे. हीच परिस्थिती शुक्रवारी राहणार असून, शुक्रवारी सायंकाळी यां बस अमरावतीत परत येतील.
अमरावती जिल्ह्यातून गुरुवारी सकाळी ११० तर सायंकाळी ६० अशा एकूण१७० बस गेल्या आहेत. बसची संख्या कमी असल्यामुळे अनेक मार्गावर बस गेलीच नाही. काही मार्गावर दोन फेऱ्यांऐवजी एक फेरी केली – आहे. अपुऱ्या बसचा फटका विद्याथ्यर्थ्यांनाही बसला आहे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी येतात.. दरम्यान गुरुवारी दुपारी बस कमी असल्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात अनेक प्रवाशी खोळंबले होते. सायंकाळी ५ वाजता बसस्थानकात प्रवाशांची चिक्कार गर्दी होती.
हि बातमी पण वाचा — काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
आज सकाळच्या अनेक बस फेऱ्या रद्द
अमरावती मध्यवर्ती बस स्थानकातून दररोज सकाळी लांब पल्ल्याच्या बसेस रवाना होतात त्यात जालना,भोपाळ,पंढरपूर ,संभाजीनगर,बेतूल,खंडवा या बसेस आहेत मात्र या सर्व बस फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे प्रवाश्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वर्धे मध्ये मोदींच्या सभेकरिता बसेस गेल्याने अमरावती बस आगाराचे सकाळचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे
ताज्या बातम्यांचे अपडेट साठी आत्ताच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा
आता आपल्या मोबाईलवरच दररोज वाचा सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक