“काँग्रेसला महाराष्ट्रात संधी देऊ नका, त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहा” : पीएम मोदी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२०वर्धा
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचे परिणामही लवकरच दिसतील. शिंदे सरकाने शेतकऱ्यांचे वीजबिल झिरो केले. सिंचनाच्या समस्या सोडविण्यसाठी प्रयत्न सुरू केले. पण मध्येच असे सरकार आले होते त्यांनी या सगळ्या कामांना ब्रेक लावला. पण पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर कामांना सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठीही आम्ही काम करत आहोत. पण आता तुम्हालाही एक खबरदारी घ्यावी लागेल. ज्या काँग्रेसनं शेतकऱ्यांचं वाटोळं केलं धोका दिला त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर एकापाठोपाठ वार केले.केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्धा शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पीएम मोदींनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. यावेळी केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी, जयंत चौधरी, राज्याचे राज्यपाल राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

सविस्तर बातमी वाचा … सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक मध्ये