तळेगाव ठाकुर येथे हाडपक गणपतीचे थाटात आगमन
ढोल ताशा वर गवळणीचे नृत्य ठरले आकर्षण
तिवसा-
तळेगाव ठाकुर मध्ये दरवर्षी हाडपक गणपतीची स्थापना होतात.यावर्षी सुद्धा हाडपक गणपतीचे मोठया थाटामाटात मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली. या गणपतीच्या मिरवणूक मध्ये विशेष आकर्षण म्हणजे गवळणीचे नृत्य.पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा तालावर गवळीने नृत्य सादर केले.आजच्या काळात गवळणी डीजे वर नृत्य सादर करतात.तळेगाव गावातील नागरिकांनी हा सोहळा पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.तळेगाव मध्ये एकूण अंदाजे दहा मंडळानी हाडपक गणपतीची स्थापना केली आहे.