आ.देवेंद्र भुयार म्हणतात….
राजकीय द्वेषातून तो व्हिडिओ व्हायरल
विदर्भ प्रजासत्ताक
दि.३अमरावती
विरोधकांनी कितीही द्वेष केला. जुने विडिओ काढून विपर्यास केला तरी मी कायम माझ्या माय माऊलींच्या सन्मानासाठी आग्रही राहिले आहे… पण राजकीय हेतूने वेडावलेल्या विरोधकांनी जो विडिओ फिरवलाय त्यांचा संदर्भ लक्षात न घेता केवळ राजकीय द्वेषातून हा व्हायरल झाला असल्याचे आ.देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या लग्नांच्या बाबतीत सध्या काय वास्तव आहे?गावगाड्यातील हे विदारक वास्तव मांडण्याचा हा प्रयत्न होता. तरीही माझ्या सदर विधानांनी माझ्या माय मावळ्यांचे मन दुखावले असेल.. तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण एखाद्या वेळी माझ्या बोलण्याने समाजातील माझी बहीण, माझी आई दुखावली असेल तर एक मुलगा म्हणून, भाऊ म्हणून त्यांची माफी मागण्यास मी तसूभरही कमी करणार नाही.
कारण त्यांच्या विश्वास आणि प्रेमावरच सामान्य घरातला मी इथपर्यंतची वाटचाल करु शकलोय याची स्पष्ट जाणीव मला आहे. ती कायम राहील असेही आ.भुयार म्हणालेत.