‘तीन नंबरचा गाळ शेतकऱ्यांच्या पोरांना; अजित पवार समर्थक आमदाराची जीभ घसरली
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२वरुड १६
जित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना चांगल्या मुली नोकरदारांना मिळतात, तर दोन नंबरच्या काळ्या मुली पानवाल्यांना मिळातात अशा आशयाचं विधान केल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.
पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर स्मार्ट हवी असेल तर ती तुमच्या, माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही. नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्यांचा पान ठेला आहे, धंदा, किराणा दुकान आहे, अशा माणसाला दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ, राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटतो, शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिलं नाही असं भुयार म्हणाले आहेत. दरम्यान महिलांविरोधातील या वादग्रस्त वक्तल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून, राजकीय वर्तुळातून देखील टीका केली जात आहे.
देवेंद्र भुयार यांचं हे वक्तव्य हे फक्त स्त्रियांचा अवमान करणारे आहे असं नाही, हे वक्तव्य इथल्या कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या भूमीपुत्रांची टिंगल टवाळी करणारं आहे. परंतु, सध्या शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे लोक यांना बोलण्याचं काही ताळतंत्र राहिलं नाही. या लोकांना वाटतं की कोणतंच पोलीस स्टेशन आमच्यावर कारवाई करू शकत नाही. या मस्तवालपणातून अशी वाक्य येतात. पण शेतकरी आणि महिलांची टींगल करणं हाच तुमचा अजेंडा आहे का? हे एकदा अजित पवार यांना विचारले पाहिजं अशी प्रतिक्रिया शिवसेना(यूबीटी) च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
दोन वर्षांपूर्वीदेखील भुयारांचे वक्तव्य चर्चेत
दोन वर्षांपूवी बोलताना देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना धक्का लावला तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही. जूना देवेंद्र भुयार अंगात आणला तर तुमची पाटीलकी काढल्याशिवाय राहणार नाही, असा दम विरोधकांना भरला होता. त्यांच्या या वक्तव्याची त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या की, महिलांच्या मतांसाठी महायुतीमध्ये एवढी चढाओढ सुरू आहे. एवढा गोंधळ घातल असताना त्यांची माणसिकता काय आहे हे दिसून येत आहे. ती काही उपभोगाचे साधन नाही की तुम्ही तिची कॅटगिरी ठरवताल लाज वाटली पाहिजे या अशा आमदारांना बोलायला. अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना नियंत्रणात ठेवले पाहिजे. त्यांची माणसीकता काय गुंड प्रवृत्तीची आहे हे दिसून आले आहे. महिलांचा अपमान करणे चुकीचे आहे.