तिसऱ्या आघाडीत आपण मेळघाट मधून कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊच शकत नाही – पटेल
मेळघाट
परिवर्तन महाशक्ती आघाडीची मोट बांधत विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडूंना निवडणुकीआधीच धक्कामोठा धक्का बसला आहे आ. बच्चू कडू यांनी स्थापन केल्लेल्या तिसऱ्या आघाडीत आपण मेळघाट मधून कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊच शकत नाही. याची कल्पना आपल्याला आली असल्याने आपण बच्चू कडू यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पस्ट मत मेळघाटचे आमदार राजकुमार यांनी व्यक्त केले. येत्या १०ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेळघाट दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत आपण शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहोत अशी माहिती आमदार राजकुमार पटेल यांनी दिली.
मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आज कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता . या मेळाव्याची कार्यक्रम पत्रिका शनिवारी शोशल मीडियावर समोर आली होती या पुत्रिकेवरून बच्चू कडू यांचा फोटो गायब होता तर एकनाथ शिंदे यांचा फोटो मोठ्या आकारात छापण्यात आला होता या पत्रिकेमुळे आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटले होते आज राजकुमार पटेल यांनी स्वतः या बद्दल माहिती दिली. तिसऱ्या आघाडीत आपण मेळघाट मधून कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊच शकत नाही यांची कल्पना मला आली व याची माहिती मी बच्चू कडू यांना दिली त्यामुळे त्यांनी स्वताहा मला निर्णय घेण्याचे सांगितले व आज मी शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी होणार असल्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळघाट मध्ये भरभरून निधी दिला व मला उमेदवारी देण्याचे हि कबूल केले असल्याचे हि पटेल म्हणालेत. तिसऱ्या आघाडीचं मेळघाटमध्ये काही ताळमेळ नाहीये, म्हणून कार्यकर्त्यांना विश्वासात घेत मी प्रहारमधून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात असल्याची प्रतिक्रिया स्वत: राजकुमार पटेल यांनी दिली आहे.त्यामुळे आता शिवसेनेचा धनुष्यबाण पटेल यांना पेलणार का? पटेल यांच्या प्रचारार्थ महायुतीचे कोणते नेते पदाधिकारी प्रचारात उतरणार का? या सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
धारणी शहरात १०० खाटांचे नवीन रूग्णालय, प्रशस्त बस्थानक, प्रशासकीय इमारत, पंस कार्यालय, एपीएमसीची अनेक विकाम कामे मंजूर केली आहे. या सर्व विकास कामांचे भुमिपुजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. येथील हायस्कुल मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.