जिल्ह्यातील सर्व मतदारांना लोकशाहीच्या उत्सवाचे निमंत्रण
मतदानासाठी जिल्हाधिकारी यांचे आवाहन
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२० अमरावती,
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 ची घोषणा केलेली असून उद्या, बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघांत मतदान होणार आहे. यादिवशी आपण आपल्या कुटुंबीयांसह मतदात करण्यास अवश्य यावे, असे जाहीर निमंत्रण जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नागरिकांना दिले आहे.
आपल्या कुटुंबातील सदस्य ज्यांची अमरावती जिल्ह्याच्या 8 मतदारसंघाच्या मतदार यादीत नावे आहेत, तथापि शिक्षण व नोकरी निमित्ताने अन्य ठिकाणी राहत असतील, तर ते जिथे काम करत असतील तेथे त्यांना पगारी रजेचा अधिकार आहे. उद्या बुधवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी खास मतदानासाठी सुटी आहे.
लोकशाहीच्या मतदानाला येतांना निवडणूक ओळखपत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्ड, वाहन चालक परवाना, फोटो असलेले बँक पासबुक, मनरेगा जॉब कार्ड इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणावे. मतदार ओळख चिट्ठी आपणास घरोघरी पाठविली आहे. त्याव्यतिरीक्त मतदार ओळख चिट्ठी (Voter Slip) निवडणूक आयोगाच्या electoralsearch.ac.gov.in या संकेतस्थळावरुन काढता येईल.
मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर आपली गैरसोय होणार नाही. आपल्या कुटुंबात दिव्यांग बांधव अथवा ज्येष्ठ नागरीक असल्यास त्यांचेसाठी Saksham App वर देखील नोंदणी करणे शक्य आहे. त्यांचेसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करण्यात येईल.
प्रत्येक मतदान केंद्रावर सावली, प्राथमिक औषधोपचार, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. मतदानाचा हक्क बजावून आपला सेल्फी फोटो स्वतःच्या मोबाईल Whats App वर Status ठेवावा. मतदानाविषयी आपणांस काही अडचण असल्यास आमच्याशी 1950 वा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. मिशन 75 अभियानांतर्गत मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे .
सीसी टीव्ही ची राहणार नजर
जिल्ह्यातील २,७०८ मतदान केंद्रांवर ११ हजार ९१९ कर्मचारी कर्तव्य बजाविणार आहे. यामध्ये ३८७३ पोलीस कर्मचारी, २४७७ होमगार्डचाही समावेश आहे. मतदानाकरिता ९८ टक्के व्होटर स्लीपचेदेखील वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील २७०८ मतदान केंद्रांपैकी १६५६ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यात आले असून या मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगद्वारे जिल्हाधिकारी यांची नजर राहणार आहे.
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचण्यासाठी आमच्या https ://epaper.vidarbhaprajasattak.com साईड ला भेट द्या !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !