अमरावती जिल्ह्यात दुपारी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.२१ टक्के मतदान
अचलपूर मतदार संघांत झाले सर्वाधिक मतदान
दि.२०अमरावती
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान होत आहे. एकाच टप्प्यामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अमरावती मध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदान करण्यास सुरूवात झाली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. राज्यभरामध्ये सर्वच राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि नागरिकांकडून मतदान केले जात आहे. त्याचसोबत राजकीय नेते आणि सेलिब्रिटी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
अमरावती जिह्यातील आठ हि मतदार संघामध्ये दुपारी ५ पर्यंत सरासरी मतदान ५३.२१ टक्के एवढे झाले होते यात अचलपूर मतदार संघात ६७.५३,अमरावती ५०.३२ बडनेरा ५३.७३ दर्यापूर ५९.९०,धामणगाव रेल्वे ५७.२० ,.मेळघाट ६४.५७, मोर्शी ६४.७४ टक्के ,तिवसा ५३.२१ टक्के मतदान झाले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १७.४५ टक्के मतदान झाले आहे.अमरावती जिल्ह्यात दुपार पर्यंत सर्वाधिक मतदान हे अचलपूर मतदार संघांत झाले सर्वाधिक मतदान तर सर्वात कमी मतदान तिवसा मतदार संघात
ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना जिल्ह्यात कुठेही घडली नसून शांततेत मतदान सुरु होते