रवी राणा, सुलभाताई खोडके, प्रताप अडसड, उमेश यावलकर, प्रविण तायडे, राजेश वानखडे, केवलराम काळे, गजानन लवटे,पोहचले विधानसभेत
बच्चू कडूला नवख्या प्रविण तायडे ने लोळविले
विदर्भ प्रजासत्ताक
दि २३अमरावती
महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना गचांडी देत महायुतीने अमरावती जिल्ह्य़ात आठ पैकी सात ठिकाणी विजय मिळवित मविआ चा महासुपडासाफ साफ केला.विद्यमान चार आमदारांचा या निवडणुकीत पराभव झाला. या निवडणुकीत प्रहारचे दबंग नेते आमदार बच्चू कडू, माजी मंत्री यशोमती ठाकूर, आमदार राजकुमारपटेल , आमदार देवेन्द्र भुयार, प्रा विरेन्द्र जगताप, अभिजीत अडसूळ, डॉ सुनिल देशमुख, तुषार भारतीय, यांचा पराभव झाला. तर बडनेरा तून युवा स्वाभिमान चे आमदार रवी राणा, अमरावतीतून राष्ट्रवादी च्या आमदार सुलभा खोडके, धामणगाव भाजपाचे रेल्वे आमदार प्रताप अडसड या तीन आमदारांचा दणदणीत विजय झाला. या व्यतिरीक्त अचलपुर मधून भाजपाचे प्रविण तायडे, भाजपाचे मोर्शी तून उमेश यावलकर, मेळघाट मधून भाजपाचे केवलराम काळे, तिवसा मधून भाजपाचे राजेश वानखडे, आणि दर्यापूर मधून शिवसेना उबाठा चे गजानन लवटे विजयी झाले.२०२४ च्या निवडणुकीत सुलभा संजय खोडके (NCP) विरोधात सुनील पंजाबराव देशमुख (INC), आणि अपक्ष जगदीश गुप्ता यांच्यासह 22 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. २०१९ मध्ये काँग्रेसला पराभूत करून राष्ट्रवादीकडे सध्या ही जागा होती, तर भाजप या जागेचा प्रबळ दावेदार समजल्या जात होता. या प्रदेशाच्या राजकीय ट्रेंडवर महत्त्वाचे परिणाम आहेत. २० नोव्हेंबरला झालेल्या मतदानाचे निकाल आज स्पष्ट होतील
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. निकालापूर्वी बरेच तर्क वितर्क लावत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तगडी फाईट असल्याचे सांगत होते पण निकालानंतर आलेल्या आकडेवारीवरून महायुतीला बहुमत मिळत स्वतंत्रपणे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे.
अलीम पटेल यांनी घेतली तिसऱ्या फेरी पासून आघाडी
आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल यांनी पाचव्या फेरीपासून आघाडी घ्यायला सुरुवात केली व पाहता पाहता त्यांनी हि आघाडी २० व्या फेरीपर्यंत कायम ठेवली त्यामुळे सगळ्यांना आचर्याचा धक्का बसला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटात प्रकाहद अस्वस्थता निर्माण झाली होती मात्र २१ व्या फेरीनंतर सुलभा खोडके यांनी जोरदार मुसंडी मारत विजयश्री आपल्या कडे खेचून आणली.
आजी माजी असलेले हे आमदार झाले पराभूत
दर्यापूर मधून रमेश बुंदेले, अभिजीत अडसूळ, अचलपुर मधून बच्चू कडू, अमरावतीतून जगदीश गुप्ता,सुनिल देशमुख मेळघाट मधून राजकुमार पटेल, मोर्शी तून देवेन्द्र भुयार, धामणगाव रेल्वे मधून प्रा विरेन्द्र जगताप, तिवसा मधून यशोमती ठाकूर हे आजी माजी आमदार पराभूत झाले.