सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२७अमरावती
राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात महायुतीशी थेट लढत असलेल्या महाविकास आघाडीची दाणादाण झाली. तर छोटे पक्ष पालापाचोळ्यासारखे उडाले. बच्च कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षालाही मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं असून, बच्च कडू यांनाही मतदारांनी झटका दिला. त्यानंतर आता बच्चू कडूंनी पुढील राजकीय वाटचालीला सुरूवात केली आहे.
पुढील काळात प्रहारने आपला राजकीय प्रवास कसा करावा, या विषयी आपले मत काय? प्रहारचा सेवेचा झेंडा यावेळी खाली आला. पुढील काळात प्रहारने आपला राजकीय प्रवास कसा करावा, याविषयी आपले मत काय? सत्तेमध्ये सहभागी असावे की सत्तेबाहेर? धर्म-जात याचा झेंडा हाती घ्यावा की सेवेचा वसा सुरू ठेवावा?, असे प्रश्न बच्चू कडू यांनी विचारले असून, जनतेकडून याबद्दल सूचना मागवल्या आहेत.
https://epaper.vidarbhaprajasattak.com